Patan : पाटणला गोळीबारात दोघांचा मृत्यू; शिवसेनेचा माजी पदाधिकारी ताब्यात

Crime news दोन जणांचा जीव घेणारी व मन सुन्न करणारी घटना गाडीची धुळ अंगावर का उडवलीस या किरकोळ कारणावरून घडली आहे.
Patan Crime news
Patan Crime newssarkarnama

-जालिंदर सत्रे

Patan News : रविवारी रात्री उशीरा बंदुकीतून गोळ्या घातल्यामुळे दोन जण जागीच ठार झाल्याची घटना पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील मोरणा गुरेघर धरणालगतच्या शिद्रुकवाडीत घडल्याने संपूर्ण पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. गोळीबार प्रकरणी संशयित आरोपी म्हणून शिवसेनेचे Shivsena माजी जिल्हा संपर्कप्रमुख मदन कदम, त्यांची पत्नी निता आणि दोन मुले योगेश व गौरव या चार जणांना पाटण पोलिसांनी Patan Police ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद या घटनेतील जखमी प्रकाश लक्ष्मण जाधव (रा. कोरडेवाडी)याने पाटण पोलीसात दिली आहे.

दोन जणांचा जीव घेणारी व मन सुन्न करणारी घटना गाडीची धुळ अंगावर का उडवलीस या किरकोळ कारणावरून घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार प्रकाश जाधव याचा चुलत भाऊ सखाराम व मदन कदम कुटुंबाच्या गाडीची धुळ अंगावर का उडवली, या कारणावरून पाच दिवसांपूर्वी वाद झाला होता. या भांडणाबाबत पाटण पोलिसांत सखाराम जाधव व मदन कदम एकमेकांच्या विरोधात तक्रारही नोंदवली आहे.

या भांडणावेळी मदन कदम याने सखाराम जाधव यास शिवीगाळ केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी मयत श्रीरंग लक्ष्मण जाधव हे मदन कदम याच्या फार्म हाऊसवर फिर्यादी प्रकाश व गावातील सतिश बाळू सावंत यांना सोबत घेऊन गेला होता. यावेळी जोरदार भांडण झाले. मदन कदम यांने पत्नी निता हिला बंदूक आणण्यासाठी सांगितले. पहिली गोळी श्रीरंग जाधव यांच्यावर झाडली. त्यानंतर फिर्यादी प्रकाश याच्याकडे मदन कदम याने बंदूक रोखली.

Patan Crime news
Konkan Shivsena : विझणारा दिवा फडफड करणारच; भास्कर जाधवांची रामदास कदमांवर बोचरी टीका

मात्र प्रकाशने मदन कदम याचा मुलगा योगेशला पुढे करून बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि मदन कदम याने दूसरी गोळी प्रकाशच्या शेजारी असलेल्या सतिश सावंत याच्यावर झाडली. योगेश व गौरव या दोघांनी प्रकाशला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मदन कदम याने बंदूकीच्या दस्ताने मारहाण केली यामध्ये प्रकाश याचा डावा हात फॅक्चर झाला असून तो सध्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

Patan Crime news
Kolhapur news: कर्मचारी म्हणतात पेन्शन द्या; बेरोजगार तरुण म्हणतात पेन्शन नको काम द्या..

घटनेची माहिती मिळताच रात्री पाटण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संशयित आरोपी मदन कदम यास ताब्यात घेतले व जख्मी झालेल्यास उपचारासाठी रुग्णालयाकडे रवाना केले. जागीच ठार झालेल्या श्रीरंग व सतिश यांच्या मृतांचे पंचनामे करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत.

Patan Crime news
Satara : बाजार समिती निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे गट भिडणार

मयत श्रीरंग हा ठाणे येथे कापड दुकान चालवत आहे तर मदन कदम मल्हारपेठ येथील कदमवाडीचा मुळ रहिवासी आहे. मदन कदम याची पत्नी निता कदम ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक तर काही वर्षांपूर्वी मदन कदम स्वतः सातारा जिल्हा संपर्कप्रमुख राहिलेला आहे

Patan Crime news
Pune News : ग्रामपंचायतीने वाढवले संपावरील कर्मचाऱ्यांचे टेन्शन; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केली 'ही' मागणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com