शिंदे, मानकुमरेंची वादावादी; जावळीत तणाव वाढला...

जावळी सोसायटी Jawali society मतदारसंघातुन राष्ट्रवादीचे हेविवेट नेते आमदार शशीकांत शिंदे shashikant Shinde व राष्ट्रवादीचेच जावलीतील कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे Dyandev Ranjane यांच्यात लढत आहे. या निवडणुकीकडे सातारा जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.
शिंदे, मानकुमरेंची वादावादी; जावळीत तणाव वाढला...
Jawali fightkudal reporter

सातारा : आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषीकांत शिंदे व जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे हे मेढा येथील मतदान केंद्रावर आमने सामने आले. त्यामुळे दोन्ही गटात राडा सुरू असून पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्याना रोखले. वातावरण तणाव पूर्ण असून आमदार शशिकांत शिंदे यांनी ऋषीकांत शिंदेंसह कार्यकर्त्यांना बाहेर जाण्याची सूचना केली.

आज सकाळी आठ वाजल्यापासून मेढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या इमारतीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जावळी सोसायटी मतदारसंघातुन राष्ट्रवादीचे हेविवेट नेते आमदार शशीकांत शिंदे व राष्ट्रवादीचेच जावलीतील कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांच्यात लढत आहे. या निवडणुकीकडे सातारा जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

Jawali fight
जिल्हा बँक निवडणूक; कराड, पाटणच्या दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

आज सकाळ पासूनच मेढा या मतदान केंद्रावर कमालीचे तणावपूर्ण वातावरण असून, दोन्ही गटांकडून विजयाचा दावा केला जात असून दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते मेढा या ठिकाणी मोठ्यासंख्येने उपस्थित आहेत. हाय होलटेज ड्रमा ठरलेल्या या लढतीमुळे सातारा पोलिसांनी मोठया प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आरसीपी, स्ट्रायकिंग फोर्स, आदी मिळून 100 हुन अधिक पोलिस मतदान केंद्रावर उपस्थित आहेत. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून आमदार शिंदे व श्री. रांजणे या दोन्ही उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Jawali fight
फडणवीस, पाटलांशी बोलूनच डॉ. भोसले गटाने केले मतदान...

दरम्यान, मतदान केंद्रावर आमदार शशीकांत शिंदेंचे बंधु ऋषीकांत शिंदे हे त्यांच्या समर्थकांसह आले होते. त्यावेळी मतदानासाठी आलेले वसंतराव मानकुमरे व त्यांचे समर्थक आमने सामाने आले. त्यामुळे दोन्ही गटात एकमेकांना दम देण्यावरून राडा सुरू झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्राच्या शंभर मीटर बाहेर जाण्याची सूचना करत हाटकले. परंतू, जावळी तालुक्यात तणाव पूर्ण वातावरण आहे.

Jawali fight
कोणी कितीही गर्जना करू देत; जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार...

आमदार शिंदे व ज्ञानदेव रांजणे यांच्या गटात हमरीतुमरी झाली. मेढा येथील मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषीकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आमने सामने भिडले. दोन्ही गटात यावेळी काही वेळासाठी राडा झाला. यावेळी वसंतराव मानकुमरे हे आक्रमक झाले, रांजणे यांच्या पत्नी सौ. अर्चना रांजणे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला, यावेळी ऋषिकांत शिंदे यांनी वसंतराव मानकुमरे व कुडाळचे प्रतापगड कारखाना संचालक मालोजीराव शिंदे यांना हातवारे करून एकमेकांना धारेवर धरले. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्याना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार शिंदे व रांजणे दोघांनीही मध्यस्थी करून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, यावेळी कमालीचे वातावरण तंग झाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in