Karad News : वीस हजारांची लाच घेताना कराड प्रांत कार्यालयातील दोन लिपिक जाळ्यात

Karad Trap येरवळे येथील नऊ शेतकऱ्यांच्या भूसंपादनाची प्रक्रीया सुरू होती. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलिस उपाधीक्षक श्रीमती उज्वल वैद्य यांनी काम पाहिले.
Bribery Karad
Bribery Karadsarkarnama

Karad News : जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांकडून वीस हजारांची लाच घेताना कराड प्रांताधिकारी कार्यालयातील दोघा लिपींकांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रंगेहात पकडले.

तक्रारदार शेतकरी संघटनेचे Shetkari Sanghatna अध्यक्ष आहेत. त्यांनी येरवळे (ता. कऱ्हाड) येथील नऊ शेतकऱ्यांच्या जमिनीच्या भूसंपादनाचा पाठपुरावा केला होता. त्या प्रकारणात लाच घेताना दोघा कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे. रामचंद्र श्रीरंग पाटील (वय 70) व दिनकर रामचंद्र ठोंबरे (70) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही कराड Karad प्रातांधिकारी कार्यालयात, भूसंपादन शाखेत कंत्राटी लिपिक आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदारांनी प्रांताधिकारी कार्यालयात मूल्यांकन प्रक्रियेबाबत पाठपुरावा केला होता. वारंवार संबधित दोघा लिपीक यांच्याशी त्यांचा संबंध आला होता. त्या दोघांनीही संबधितांकडे मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाचेची मागणी होती. त्या लाच रक्कम स्वीकारताना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले आहे.

Bribery Karad
Satara News : शिवेंद्रराजेंना पाडूनच रिटायर्डमेंट घेणार : दीपक पवारांचा निश्चय

दोघानी प्रत्येकी 10 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी ती लाच गेताना दोघांनाही अटक झाली. तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार खात्याने 16 व 17 मो रोजी त्याची पडताळणी केली. प्रत्यक्षात आज सापळा रचला. त्यात दोघेही कर्माचारी अडकले.

Bribery Karad
LIVE : Devendra Fadnavis यांच्या भाषणाचा नेमका अर्थ | BJP | Sarkarnama Video

येरवळे येथील नऊ शेतकऱ्यांच्या भूसंपादनाची प्रक्रीया सुरू होती. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलिस उपाधीक्षक श्रीमती उज्वल वैद्य यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक विक्रम पवार, सहायक पोलिस निरिक्षक शंकर सावंत, हवालदार निलेश राजपूरे, विक्रमसिंह कणसे यांना सापळा पथकात काम पाहिले. पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांनी मार्गदर्शन केले.

Bribery Karad
Satara Bribe News : पंधराशे रूपयांची लाच घेताना दुय्यम निबंधकास पकडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com