ऊसदराच्या मागणीसाठी मंगळेढा आणि पंढरपुरात ऊस वाहतूक रोखली...

Pandharupr : ऊस वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टर चे टायर फोडले‌
sugarcane agitaion, Pandharpur Latest News
sugarcane agitaion, Pandharpur Latest NewsSarkarnama

पंढरपूर : ऊस दराच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मंगळवेढा आणि पंढरपूर येथे रात्री ऊस दर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली होती.

ऊसदराच्या मागणीसाठी ऊसदर संघर्ष समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बुधवारी (ता.२६ ऑक्टोबर) रात्री वाखरी येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टर चे टायर फोडले‌ आणि त्यानंतर रात्री मंगळवेढा आणि पंढरपूर ऊस वाहतूक रोखली होती. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी ऊसाच्या वाहनांची हवा सोडून आंदोलन करण्यात आले आहे. (sugarcane agitaion, Pandharpur Latest News)

sugarcane agitaion, Pandharpur Latest News
Tata Airbus : गुजरात निवडणुका जिंकण्यासाठीच प्रकल्प पळवले : रोहित पवारांचा आरोप!

यंदाच्या हंगामात ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये जाहिर करावी,अशी मागणी ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. कालपासून ऊसदर आंदोलन तीव्र झाले असून अनेक भागातील शेतकऱ्यांनी ऊसदराच्या मागणीसाठी ऊस तोडी बंद केल्या आहेत. तर काही ठिकाणी ऊस वाहतूक रोखली जातं आहे.

sugarcane agitaion, Pandharpur Latest News
मनसे आमदारानं मुख्यमंत्री शिंदेंना करुन दिली आठवण; म्हणाले, आता तरी मुहूर्ताची..

दरम्यान, या आंदोलनामुळे ऊस तोडणीची कामे पन्नास टक्के बंद झाल्याने कारखान्याच्या गाळपावर परिणाम झाला आहे. आंदोलना संदर्भात ऊसदर संघर्ष समिती आणि साखर कारखानदार यांची लवकरच बैठक घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com