नगर जिल्ह्यातील व्यापारी लॉकडाऊन विरोधात आक्रमक
Merchants making a statement of demandSanjay A. Kate

नगर जिल्ह्यातील व्यापारी लॉकडाऊन विरोधात आक्रमक

श्रीगोंदे ( Shrigonda ) तालुक्यातील 9 गावे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. यात काष्टीचाही ( Kashti ) समावेश आहे.

श्रीगोंदे (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या जास्त असलेल्या गावांत लॉकडाऊन केले आहे. श्रीगोंदे तालुक्यातील 9 गावे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. यात काष्टीचाही समावेश आहे. नवरात्री आज पासून सुरू झाल्या दसरा व दिवाळी सण जवळ असल्याने लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. Traders in the Nagar district are aggressive against the lockdown

त्यामुळे सणासुदीच्या काळात तालुक्यातील लॉकडाऊन उठवावा, कोरोनाचे रुग्ण वाढल्याचा प्रशासनाचा दावा असल्याने काष्टी बंद केली. मात्र, प्रत्यक्षात बाहेरचे रुग्ण काष्टीतील दाखविल्याने गोंधळ झाला आहे. लॉकडाऊन उठवावा, अशी मागणी करीत काष्टीतील चारशे व्यापारी आज तहसील कार्यालयापुढे उपोषणाला बसले होते.

Merchants making a statement of demand
शेजारी जामखेडमध्ये कोरोना, आपला श्रीगोंदे दूरच बरा

'जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून वेळेत सवलत मिळते का हे पाहतो' या प्रांताधिकाऱ्यांच्या आश्वासनावर उपोषण स्थगित झाले. कोरोना लॉकडाऊनमुळे तालुक्यातील नऊ गावे बंद आहेत. दसरा, दिवाळी तोंडावर असल्याने व्यापारी या बंदमुळे मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच काष्टीतील व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवित काही वर्षातील सगळ्यात मोठे उपोषण तहसील कार्यालयापुढे आज केले. उपोषणात काष्टी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय काळे, राकेश पाचपुते, वैभव पाचपुते, बंडू जगताप, राहुल पाचपुते, सुनील पाचपुते, महेश कटारिया, शहाजी भोसले, माऊली पाचपुते किशोर बोगावत या प्रमुखांसह व्यापारी सहभागी झाले होते. उपोषणाला आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, अनुराधा नागवडे, सुवर्णा पाचपुते यांनी भेट देत चर्चा केली.

Merchants making a statement of demand
श्रीगोंदे नगरपालिकेत भाजपचा गड आला, पण सिंह गेला

काळे म्हणाले, काष्टीतील बंदमुळे व्यापाऱ्यांसोबतच सामान्यांचे नुकसान झाले आहे. कोरोनाचे रुग्ण काष्टीत दाखविले यात आमचा दोष नाही. प्रशासनाने त्यांच्या चुका सुधाराव्यात आम्ही मदत करु. हातावर पोट असणाऱ्या व्यवासायिकांची जशी कोंडी झाली तसेच कर्ज घेवून व्यापार उभारणाऱ्यांचा कोंडमारा झाला आहे. प्रशासनाने समजून घेवून मदत करावी.

प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार मिलींद कुलथे, अप्पर तहसीलदार चारुशिला पवार चर्चेत होते. भोसले म्हणाले, 13 ऑक्टोंबरपर्यंत व्यापाऱ्यांनी मदत करण्याचे मान्य केले आहे. सध्याच्या बंदमध्ये वेळेची काही सुट देता येते का याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. लोकांनी कोरोनाचे नियम पाळून लसीकरणातील सहभाग वाढवावा असे आवाहन केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in