एसटीत असलेल्या दोन भावांचा आधीच मृत्यू; त्यांच्या मुलांवरही काळाचा घाला

अहमदनगर-मनमाड महामार्गावरी पत्रकार चौक हा धोकादायक वळण ठरत आहे.
Accident
AccidentSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर-मनमाड महामार्गावरी पत्रकार चौक हा धोकादायक वळण ठरत आहे. या चौकात नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात. आज झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले. यातील एक जण आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मुलगा होता. तर दुसऱ्याचे वडीलही एसटीत होते. त्यांच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी अपघातात निधन झाले होते. ( Time again on the family of the deceased ST employee )

पत्रकार चौकात आज ( मंगळवारी ) दुपारी 3 च्या सुमारास मालट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात मालट्रकखाली दुचाकीवरील दोन्ही युवक चिरडले गेले. या युवकांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान याबाबत यामुळे महामार्गावर वाहतूक व्यवस्था काही काळ ठप्प झाली होती. अपघातामध्ये मयत झालेले दोघेही हे पाथर्डी तालुक्यातील कोल्हार कोलुबाईचे या ठिकाणचे रहिवासी आहेत. बाळकृष्ण श्रीकांत तेलोरे (वय 22) व उद्धव सुभाष तेलोरे (वय 21, दोघे रा.कोल्हार कोलुबाईचे, ता.पाथर्डी) असे या मयत युवकांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Accident
सुजय विखे पाटील म्हणाले, जनताच ठरवेल कोणाचा कार्यक्रम होईल...

या अपघातानंतर पोलिसांनी त्यांच्या खिशातील आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसन तसेच महाविद्यालयाचे ओळखपत्र अशा कागदपत्रांच्या आधारावरुन दोघांची ओळख पटविली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी (ता. 29) दुपारी 3 च्या सुमारास मालट्रक (क्र.एम.एच.16, सी.सी. 5759) हा सावेडीकडून डीएसपी चौकाकडे जात असताना पत्रकार चौकात सदर मालट्रकने हिरो होंडा पॅशन मोटारसायकलला (क्र.एम.एच.16, बी.ई.4955) समोरुन जोराची धडक दिली. यावेळी मोटारसायकलवरील दोघे युवक मालट्रकच्या चाकाखाली अडकून जागेवरच मयत झाले. अपघातानंतर ट्रकचालक वाहन सोडून पसार झाला.

Accident
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

यातील उद्धव तेलोरे हा आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचारी सुभाष तेलोरे यांचा मुलगा आहे. सुभाष तेलोरे यांनी 21 सप्टेंबर 2021 ला संगमनेर येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. बाळकृष्ण तेलोरेचे वडील श्रीकांत तेलोरे यांचा दोन महिन्यांपूर्वी कोल्हार ते उदरमल दरम्यानच्या रस्त्यावर अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांचे निधन झाले होते. आसाम येथे सैन्य भरती होणार आहे. त्यासाठी उद्धव तेलोरे तिकीट काढण्यासाठी आला होता. त्याच्या बरोबर बाळकृष्ण आला होता. उद्धव व बाळकृष्ण हे दोघेही चुलतभाऊ आहेत.

मागील काही दिवसांपासून शहरात अवजड वाहतूक होत आहे. त्यामुळे असे अपघात होत आहेत. असे प्रकार घडू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शहर वाहतूक शाखेत आंदोलन केले होते. आज झालेला अपघात शहर वाहतूक शाखे समोरच झाला आहे.

- प्रा. माणिक विधाते, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अहमदनगर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com