विक्रम राठोडांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

विक्रम राठोड यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
Anil Rathod & Vikram Rathod
Anil Rathod & Vikram RathodSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर महापालिकेतील शिवसेना नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी देणारा आरोप पकडला जात नाही तोच युवा सेनेचे सहसचिव तथा दिवंगत मंत्री अनिल राठोड यांचे चिरंजिव विक्रम राठोड यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच विक्रम राठोड यांनी जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले होते. हे प्रकरण शांत होत नाही तोच त्यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली. ( Threats to kill Vikram Rathod again )

युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड यांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 10 एप्रिलला राठोड हे नेताजी सुभाष चौकात रामनवमी मिरवणुकीच्या स्वागतासाठी उभे होते. त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी मिरवणुकीचे स्वागत करून मिरवणुकीत नाचत असताना गजेंद्र सैंदर याने राठोड यांना धक्का दिला व त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या साथीदारांनी राठोड यांना मारण्याच्या उद्देशाने त्यांना घेराव घातला.

Anil Rathod & Vikram Rathod
अनिल राठोड यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी

राठोड यांच्या सहकार्यांनी त्यांना तेथून बाहेर काढले. त्यानंतर दहा मिनिटांनी मिरवणुकीतून जात असताना गजेंद्र सैंदर याने कोयत्याचा धाक दाखवून राठोड यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने 'तू इकडे ये, मिरवणुकीत तुझा काटाच काढतो', असा दम दिला. सैंदर व त्याचे साथीदार काही दिवसांपासून जिवे मारण्याच्या उद्देशाने राठोड यांचा पाठलाग करत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसात गजेंद्र प्रकाश सैंदर (रा. अहमदनगर) याच्यासह चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Anil Rathod & Vikram Rathod
नगरमधील शिवसेना नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी

विक्रम राठोड यांनी याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर बुधवारी ( ता. 13 ) त्यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन करत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शिवसेना नगरसेवक अमोल येवले यांनाही जीवे मारण्याची धमकी देत तोडफोड करण्याची घटना घडली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com