Sanjay Raut : छत्रपतींच्या गादींचा अपमान करणाऱ्यांना येऊच द्यायला नको होते; देसाईंची राऊतांवर टीका

Sahambhuraj Desai : अदित्य ठाकरे, विनायक राऊत यांच्याही घेतला समाचार
Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiSarkarnama

Satara News : छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल दोन वर्षापूर्वी संजय राऊत यांनी 'तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असाल तर पुरावे द्या', असे वक्तव्य केले होते. छत्रपतींच्या गादीचा अपमान करणारे वक्तव्य करणारे राऊत हा साताऱ्यात येतो, छत्रपती घराण्याला कोणाची तरी उपमा देतो हे न सहन होणारे आहे. संजय राऊत यांना साताऱ्यात येऊच द्यायला नको होते, असे ठाम मत उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले.

मंत्री देसाई (Shambhuraj Desai) हे कऱ्हाड (जि. सातारा) दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल दोन वर्षापूर्वी संजय राऊत यांनी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असाल तर पुरावे द्या, असे वक्तव्य केले होते. छत्रपतींच्या गादीचा अपमान करणारे वक्तव्य करणारे राऊत हा साताऱ्यात (Satara) येतो, छत्रपती घराण्याला कोणाची तरी उपमा देतो हे न सहन होणारे आहे."

छत्रपती उदयनराजे (Udayanraje), छत्रपती शिवेंद्रराजे यांच्याबद्दल दोन वर्षापूर्वी राऊत बोलले होते, त्याबाबतीत तीव्र भावना शिवप्रेमींच्या आहेत. सातारकऱ्यांनी याबातीतील विचार करणे गरजेचे आहे. संजय राऊत यांना साताऱ्यात येऊच द्यायला नको होते, असे मतही देसाईंनी यावेळी व्यक्त केले.

Shambhuraj Desai
Bawankule : शरद पवारांनी कदाचित तीन राज्यांमधील निवडणुकीचे निकाल पाहिले नसावे !

देसाई यांनी राऊत, अदित्य ठाकरे (Aditya Thackeray), विनायक राऊत यांच्यावर टीका केली. देसाई म्हणाले, "सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आदित्य ठाकरेना विधानसभा लढवण्यासाठी पाटण (Patan) मतदार संघात पाठवावे. विनायक राऊत (Vinayak Raut) कुणाच्या जीवावर खासदार झाले हे त्यांनी विसरु नये. शिवसेना पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळाले आहे. त्यामुळे खरे बोलले की लोकांना राग येतो. विनायक राऊत यांनी आता कोकणातून निवडून येवून दाखवावे.

Shambhuraj Desai
Maharashtra Politics : तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर पोराला...; बंडू जाधवांचा ठाकरेंना घरचा आहेर

देसाई यांनी कसबा निवडणूक आणि धरणग्रस्तांबाबत भाष्य केले. त्यांनी सांगितले की, "कसबा पोटनिवडणुकीत काही त्रुटी राहिल्या. त्या त्रुटी सुधारल्या पाहिजेत. धरणग्रस्त समितीचा मी अध्यक्ष आहे. प्रत्येक प्रकल्पानिहाय सुसूत्रपणा असावा म्हणून एक धोरण ठरवत आहोत. अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. अधिवेशन संपण्यापूर्वी उच्चाधिकारी समितीची बैठक मुंबईत घेतली जाईल."

औरंगजेब हा महाराष्ट्र व्देष्ठा होता. त्याने छत्रपती संभाजी महाराजांना हाल-हाल करुन मारले. महाराष्ट्रात त्याचा उदोउदो होत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. तेथील पालकमंत्री संदीपान भुमरे याची दखल घेवून त्यावर निश्चित कारवाई करतील, असा इशाराही देसाई यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in