विकासकामांची काविळ झालेल्यांनी निधीची काळजी करु नये... शिवसेनेचे प्रतिउत्तर

शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी मुंबई Mumbai येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात budget session कोयना विभागामध्ये Koyana Division पर्यटनाच्यादृष्टीने कोयना निसर्ग परिचय केंद्रासाठी Koyna Nature Introduction Center पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे.
विकासकामांची काविळ झालेल्यांनी निधीची काळजी करु नये... शिवसेनेचे प्रतिउत्तर
Shambhuraj Desaisarkarnama

कोयनानगर : गत पाच वर्षात कोयना पर्यटन हे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे नावाजलेले ठिकाण झाले आहे. कोयनेतील अनधिकृत बोटींगला अधिकृत दर्जा मिळण्यासाठी ते सातत्याने संघर्ष करत आहेत. कोयना परिचय केंद्राची काळजी विकास कामांची काविळ झालेल्यांनी करु नये. महाविकास आघाडी सरकार म्हणायचं आणि तालुक्यात मंजूर झालेल्या विकास कामांबाबत प्रसिध्दीपत्रकाव्दारे टिपण्णी करणाऱ्या काही रिकामटेकडया मंडळींनी पत्रकांव्दारे केलेले आरोप बालिशपणाचे आहेत, असे प्रतिउत्तर शिवसेनेचे माजी सरपंच शैलेंद्र शेलार, सरपंच सावळाराम लाड, सरपंच शंतनू भोमकर व युवासेना कोयना अध्यक्ष अजय देसाई यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

याबाबतच्या प्रसिध्दीपत्रकांत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, पर्यटनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर गृहराज्यमंत्री शंभराज देसाई यांच्या शासकीय स्तरावर भेटेल त्या माध्यमातून कोयना पर्यटनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे. कोयना पर्यटन आराखडयातून कोयनानगर येथील नेहरु उद्यानाचे सुशोभिकरण व नुतनीकरण, जुन्या झालेल्या कारंजाचे सुशोभिकरण व नुतनीकरण, शासकीय विश्रामगृह चेमरीचे नुतनीकरण, पर्यटकांकरीता बैठक व्यवस्था, लहान मुलांच्याकरीता वॉटर पार्क, आंबाखेळती देवी मंदिर बोपोली ढाणकल येथे परिसर सुशोभिकरण, ओझर्डे निसर्गरम्य तीन धारी धबधबा परिसर सुशोभिकरण या कामांकरीता निधी मंजूर करण्यात आला.

Shambhuraj Desai
शंभूराज देसाई यांचा कोयना पर्यटनासाठी काही उपयोग नाही

नुकतेच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोयना विभागामध्ये पर्यटनाच्यादृष्टीने कोयना निसर्ग परिचय केंद्रासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. कोयना विभागातुन या पर्यटनाचा फायदा केवळ आणि केवळ स्थानिक लोकांना व्हावा यासाठी शंभूराज देसाई नेहमीच प्रयत्नशील आहेत. पर्यटनासाठी मंजूर होणारा निधी आणि त्या अनुषंगाने त्यांच्या वाढती लोकप्रियता या संबंधिची कोयना विभागातील काही पदाधिकाऱ्यामधील मळमळ त्यांनी निवेदनाद्वारे केलेल्या आरोपातून दिसून येत असल्याचे पत्रकांत नमूद करत शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातूनच कोयना जलाशयामध्ये बोटींग सुरु होण्यासंदर्भात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Shambhuraj Desai
कोरोनामुळे पाटण तालुक्यात बळी गेल्यास शांत बसणार नाही : सत्यजितसिंह पाटणकरांचा इशारा 

स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराची चिंता करणाऱ्यांना स्वत: किती प्रयत्न करून रोजगार निर्मिती केली याची माहिती घ्यावी. हुंबरळी एमटीडीसीच्या रस्त्यासाठी प्रेम दाखवणाऱ्यांना खरच पर्यटकांची काळजी आहे की कोणाची, हेही सांगीतले असते तर बरे झाले असते. संकटाच्या काळात घरात बसणाऱ्यांनी, आजपर्यंत सत्तेचा वापर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी तसेच कामांची मक्तेदारी करणाऱ्यांनी जनतेचा फुकटचा कळवळा आणू नये.

Shambhuraj Desai
जयंतरावांचा शंभूराज देसाईंना सूचक इशारा : आम्ही ताकदीने लढलो; तर टिकाव लागणार नाही!

शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून विकासाची कामे मंजूर करुन कसलेही राजकीय हेवे-दावे न करता कोयना विभागातील जनतेपर्यंत विकास कामे पोचविण्याचे आम्ही काम करत असल्याने नेमकं कुणाच्या मागं जनता फरकटत आहे हे ही सर्वश्रुत आहे. केवळ राजकीय स्वार्थसाठी आमच्या नेतृत्वावर आरोप करून आपल्या स्वतःच्या नेत्याची निष्क्रियता आणि नाकर्तेपणा झाकला जाणार नाही. आम्ही राजकीय मर्यादा पाळणारी माणसे आहोत, संबंधित विभागाची ठेकेदारी तुम्ही करायची आणि स्थानिकांना भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना वेळोवेळी आंदोलने करायला लावून तुम्ही तुमचे राजकीय स्वार्थ कसे साधले हे सांगायची वेळ येणार नाही, याची चिंता करावी, असे पत्रकांत नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.