Usha Raut & Rohini Ghule
Usha Raut & Rohini GhuleSarkarnama

कर्जत नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारताच केला हा निश्चय

आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने कर्जत नगर पंचायत निवडणुकीत विजय मिळविला.

कर्जत ( जि. अहमदनगर ) - कर्जत नगर पंचायतची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने कर्जत नगर पंचायत निवडणुकीत विजय मिळविला. उषा राऊत यांना नगराध्यक्षा करण्यात आले. पदभार स्वीकारताना उषा राऊत यांनी पर्यावरण रक्षणासाठी यापुढे ई व्हेईकलचा वापर करणार असा निश्चय केला. ( This was decided by the Karjat mayor as soon as he took office )

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत यांनी पेट्रोल, डिझेल गाडीला फाटा देत आजपासून ई व्हेईकल वापरण्यास सुरवात केली. व त्याच गाडीत नगरपंचायतीत जात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत पदभार स्वीकारला.

Usha Raut & Rohini Ghule
रोहित पवारांनी नामदेव राऊतांच्या सुनेला बनविले कर्जतचे नगराध्यक्ष : रोहिणी घुले उपाध्यक्ष

माझी वसुंधरात प्रथम क्रमांक हेच ध्येय असून राजकीय जोडे बाजूला ठेवीत शहर हेच माझे कुटुंब आणि प्रत्येक नागरिक त्यातील सदस्य मानीत सर्वांगीण विकास साधित स्वप्नातील कर्जत उभे करू, नगरपंचायतच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करू अशी साद देत त्यांनी सबका साथ सबका विकास यावर भर दिला जाणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कर्जत नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडीने कर्जत नगरपंचायतीत निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. येथील नगरपंचायती च्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा अक्षय राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेस (आय) च्या रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Usha Raut & Rohini Ghule
रोहित पवार गडकरींना भेटताच सुजय विखें म्हणाले मी पण प्रयत्न करतोय...

नगराध्यक्षा उषा राऊत यांनी आज नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन घुले, गटनेते संतोष म्हेत्रे, उपनेते सतीश पाटील, नगरसेवक अमृत काळदाते, भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, नगरसेविका प्रतिभा भैलुमे, ताराबाई कुलथे, मोनाली तोटे, सुवर्णा सुपेकर, छाया शेलार, अश्विनी गायकवाड, ज्योती शेळके, लंकाबाई खरात यांच्या सह राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, शहराध्यक्ष प्रा.विशाल म्हेत्रे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव आदी उपस्थित होते.

Usha Raut & Rohini Ghule
आमदार रोहित पवार जेव्हा गेले नगर महापालिकेत...

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांचे नेतृत्वाखाली आणि प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांच्या मार्गदर्शनाखाली या मिळालेल्या संधीचे सोने करू. माझी वसुंधरा या स्पर्धेत गेल्या वर्षी कर्जतचा दुसरा क्रमांक आला, यावर्षी या अभियानात राज्यात पहिला नंबर मिळवायचा आहे, यासाठी मोठ्या जोमाने सर्वांना बरोबर घेऊन नियोजन पुर्वक काम सुरू आहे.

- उषा राऊत - नगराध्यक्षा, कर्जत नगरपंचायत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com