शिर्डी विमानतळातील कार्गो सेवेने गाठला हा टप्पा

देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या शिर्डी देवस्थान परिसरात जाण्यासाठी शिर्डी विमानतळ सुरू करण्यात आले आहे.
cargo service at Shirdi Airport
cargo service at Shirdi AirportSarkarnama

अहमदनगर - देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या शिर्डी देवस्थान परिसरात जाण्यासाठी शिर्डी विमानतळ सुरू करण्यात आले आहे. या विमानतळातील वाहतूक सेवेला अनेक विघ्नांना समोरे जावे लागले आहे. मात्र विमानतळ प्रशासन व महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलप्मेंट कंपनी यांच्या प्रयत्नांमुळे या विमानतळावरून कार्गोने ( विमानाद्वारे माल वाहतूक ) एक मोठा पल्ला काल पूर्ण केला. त्यामुळे राज्याला आर्थिक चालना मिळण्यास मदत झाली आहे. ( This stage was reached by the cargo service at Shirdi Airport )

शिर्डी विमानतळावरील या कार्गो सेवे बाबत महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलप्मेंट कंपनी मुंबईचे अध्यक्ष दीपक कपूर यांनी ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की, शिर्डी विमानतळावरील कार्गो सेवेने 1 लाख किलो साहित्याची वाहतूक करण्याचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व राज्याच्या अर्थकारणाला चालना मिळण्यास मदत झाली आहे.

cargo service at Shirdi Airport
शिर्डी, धुळे, अमरावती व कराड या विमानतळांवर आता विमान उड्डाण प्रशिक्षण

मागील सहा महिन्यांत पाऊस, धुके, गारपीट अशा अडचणींमुळे वाहतूक सेवेवर परिणाम होत होता. यातील काही दिवस शिर्डी विमानतळातून विमानांचे उड्डाण रद्द करावे लागले होते. यातच कार्गो सेवेने मात्र प्रतिकुल परिस्थितीवर मात करत वाहतुकीचे मोठे लक्ष्य साध्य केले आहे. शिर्डी विमानतळावरून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कार्गो सेवा सुरू करण्यात आली. मागील सहा महिन्यांत 1 लाख किलो कार्गो झाले. शिर्डी विमानतळावरील ही सर्व कार्गो सेवा स्पाईस जेटने दिली आहे.

cargo service at Shirdi Airport
शिर्डी विमानतळ प्रश्नावर सुजय विखेंच्या प्रयत्नाला यश

शिर्डी विमानतळातून स्पाईस जेटने मागील सहा महिन्यांत ही माल वाहतूक ( कार्गो ) सेवा दिली आहे. यात शेतमाल, वाणिज्य, दुग्धजन्य पदार्थ, मत्स्य, देवांच्या मूर्ती व तत्सम वस्तूंचा यात समावेश आहे.

- कृष्णा शिंदे, कार्गो व्यवस्थापक, स्पाईस जेट, शिर्डी विमानतळ.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com