
सातारा : शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांपैकी 80 टक्के आमदार 'ईडी'वाले आहेत. संजय राऊतांवर झालेली ही कारवाई राजकीय सुडापोटीच आहे. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांची ही शेवटची टर्म असल्याचा टोला माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांनी लगावला आहे.
माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. शंभूराज देसाई यांची ही शेवटची टर्म असल्याचे प्रत्युत्तर त्यांनी दिले. दगडूदादा सपकाळ म्हणाले, शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांपैकी 80 टक्के आमदार 'ईडी'वाले आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे भाजपची वाट लावत होते. त्यामुळे राजकीय सुडापोटीच ही कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेनेतील काही लोकांनी गद्दारी केली. त्यांच्या गद्दारीमुळे आम्हाला 'निष्ठा यात्रा' काढावी लागली आहे. आमचा शिवसैनिक जागेवर आहे. जे गेले ते लवकरच पदावरून पायउतार होतील आणि त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.ईडीच्या कारवाईवरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करणाऱ्या माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांनी कडक शब्दांत समाचार घेतला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.