Tanpure Vs Kardile : हा तर तीन गावांना पन्नास वर्षे मागे नेणारा निर्णय...

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
Prajakt Tanpure News, Eknath Shinde News in Marathi, Political News Updates
Prajakt Tanpure News, Eknath Shinde News in Marathi, Political News UpdatesSarkarnama

Tanpure Vs Kardile : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांच्या समर्थकांच्या ताब्यात नागरदेवळेसह परिसरातील तीन ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत करण्याचा घाट प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी नगरविकास राज्यमंत्री असताना घातला होता. महाविकास आघाडीच्या या निर्णयाला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. या निर्णयाने नागरदेवळ्यासह तिन्ही गावांत ग्रामपंचायती ‘जैसे थे’ राहणार आहेत. या संदर्भात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

प्राजक्त तनपुरे म्हणाले की, नागरदेवळे नगरपरिषद रद्द करून, पुन्हा ग्रामपंचायत करण्याचा भाजप सरकारचा निर्णय अत्यंत दुर्दैवी व राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. त्याने माझ्या राजकारणात काही फरक पडणार नाही. मात्र, नागरदेवळे, वडारवाडी व बाराभाबळी या गावांना विकासापासून पन्नास वर्षे मागे नेणारा निर्णय आहे. भाजपच्या या धोरणाचा निषेध करतो, असे त्यांनी सांगितले.

Prajakt Tanpure News, Eknath Shinde News in Marathi, Political News Updates
रोहित पवारांच्या मतदारसंघात बैलगाडे सुसाट : प्राजक्त तनपुरे म्हणाले...

ते पुढे म्हणाले, की नागरदेवळे नगरपरिषद स्थापन करताना एक टक्काही राजकीय हेतू ठेवला नव्हता. आमदार झाल्यावर या भागात वाढत्या शहरीकरणामुळे उद्‍भवलेल्या कचरा व पिण्याच्या पाण्याच्या समस्या प्रकर्षाने जाणवल्या. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नाही. आजही लोक अक्षरशः कचरा जाळतात. बुऱ्हाणनगर पाणीपुरवठा योजनेतून अनेक उपनगरांना आठ दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळते.

नगरविकास खात्याचा राज्यमंत्री असल्याने नगरपरिषदेच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याच्या प्रामाणिक उद्देशाने नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या काळात कचरा डेपोसाठी जागा पाहिली. मुख्याधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव तयार करून पाठविला. त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र आता, ही जागा हस्तांतराचा निर्णय होण्याविषयी साशंकता आहे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

Prajakt Tanpure News, Eknath Shinde News in Marathi, Political News Updates
राज्यात सत्तापरिवर्तन होताच तनपुरेंचा डाव कर्डिलेंनी उलटला

मागील सरकारने घेतलेले निर्णय चांगले की वाईट, हे न पाहताच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन, मागील सरकारचे निर्णयांना स्थगिती देण्याचे काम सुरू केले आहे. नगरपरिषद स्थापनेमागे जनतेचे प्रश्न सुटावेत, एवढीच भावना होती. त्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून, निर्णय बदलता येईल काय, यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही आमदार तनपुरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com