Sharad Pawar on BJP : हा तर 'त्या' शपथेचा भंग...; पवारांनी भाजपला करुन दिली 'त्या' शपथेची आठवण

Sharad Pawar | ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात काहीना काही आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar on Karnatak Elections : ''ज्यावेळी आम्ही फॉर्म भरतो, ज्यावेळी आम्ही राज्यपाल, स्पिकर, लोकांच्या समोर शपथ घेतो. त्यावेळी आम्ही शपथ घेतो की, आमचा, लोकशाही, धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे. जे आमदार झाले, मंत्री झाले. त्यांनीही या शपथा घेतल्या आहेत. पण धर्माच्या आणि जातीच्या नावाने मतं मागणं त्या शपथेचा भंग आहे. पण देशाचे पंतप्रधान या प्रकारची भूमिका देशासमोर मांडतात, याची मला गंमत वाटते.''अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.

आज सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ''तुमच्या हातात सत्ता होती, तुम्ही काय करुन दाखवलं ते सांगां, आज जिथेही जाऊ. तिथे ४० टक्के कमीशनची टीका केली जाते. आज आपल्याकडे ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात काहीना काही आहे. त्या लोकांनी ते अनुभवलंही आहे. (Sharad Pawar News)

Sharad Pawar
Vijay Wadettiwar News : राजकारणात सर्वांचीच घरे काचाची असतात, असं का म्हणाले वडेट्टीवार?

शरद पवार म्हणाले की, '' राजकारणात नसलेल्या माझ्या एका सहकाऱ्याने काल मी विचारलं की तुमच्याकडे काय परिस्थिती आहे, त्यांनी सांगितलं की, ते माॉर्निंग वॉकला गेले असताना काही लहान मुलं शाळेत निघाली होती. तिथून मनसेची गाडी गेली. ते पाहून त्या मुलांनी घोषणा दिल्या, गद्दार गद्दार खोकेवाले खोकेवाले, असा अनुभव त्यांनी मला सांगितला. आता हे ९-१० वर्षांची मुलं बोलायला लागली असतील, तर खोक्यांचा संदेश कुठवर गेलाय ते दिसत आहे.'' असा टोलाही त्यांनी भाजपला यावेळी सांगितलं. (Maharashtra Politics)

याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला आहे. भाजपमध्ये आदेशाची पद्धत आहे. भाजपचा आदेश एकनाथ शिंदे यांना मान्य करावा लागतो, अशा शब्दांत शरद पवार यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in