'ही तर ठाकरे सरकारला मोठी चपराक'
Ram ShindeSarkarnama

'ही तर ठाकरे सरकारला मोठी चपराक'

महाराष्ट्रात ( Maharashtra ) देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री ( CM ) असताना दुष्काळी भागांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले होते. या अभियाना संदर्भात महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सरकारने चौकशी समिती नियुक्त केली होती.

अहमदनगर : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दुष्काळी भागांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले होते. या अभियाना संदर्भात महाविकास आघाडी सरकारने चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीचा अहवाल आला असून त्यात आमचे कौतूकच केले असल्याचे सांगत भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीका केली आहे. 'This is a big slap in the face to the Thackeray government'

राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची कल्पना राम शिंदे यांचीच होती. राम शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी, दुष्काळ निवारणासाठी जलयुक्त शिवार अभियानाची निर्मिती करण्यात आली. या अभियानातून 6 लाख कामे केली. 22 हजार गावांमध्ये हे काम केले. त्या माध्यमातून भूजलपातळीत वाढ झाली. शेतकऱ्यांनी पाणी उपसा केला तरीही भूजल पातळीत फारसा फरक पडला नाही. पीक क्षेत्रात वाढ झाली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच प्रयत्न केला.

Ram Shinde
राम शिंदे म्हणाले, त्यांचा महाराष्ट्र बंदचा प्रयोग फसला...

ते पुढे म्हणाले, या अभियाना संदर्भात ठाकरे सरकारने चौकशी समिती नेमली. यासाठी विशेष तपासणी पथकामार्फत ही तपासणी केली. त्यात काही आढळले नाही म्हणून दुसरी तपासणी केली. लाचलुचपत विभागामार्फत चौकशी केली. दोन वेळा चौकशी करूनही काहीही आढळले नाही. या संदर्भात जलसंधारण विभागाने नुकताच अहवाल सादर केला आहे. त्या अहवालात कोणताही आक्षेप नोंदवलेला नाही. त्यामध्ये कोणतीही त्रुटी आढळून आलेली नाही. उलट जिओ टॅगिंगमुळे गुणवत्ता वाढली.

Ram Shinde
राम शिंदे म्हणतात, ठाकरे सरकार शेतकरीद्रोही

त्रयस्त संस्थेकडूनही त्याची तपासणी करण्यात आली. पालघर, सोलापूर, अहमदनगर, बीड, बुलढाणा, नागपूर या भागामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी क्षेत्रात वाढ झाली, अशा प्रकारचे चित्र अहवालात निर्माण झाले. म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने दुष्काळी शेतकऱ्यांसाठी घेतलेला निर्णय पारदर्शक आणि प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी जलयुक्त शिवार अभियान घेतले. चौकशी समितीकडून आरोप प्रत्यारोप होण्या ऐवजी पारदर्शक व प्रामाणिकपणाने दिलासा देण्याचे काम केले. या चौकशीमध्ये युती सरकारचे व देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले आहे, असेही शिंदे यांनी सांगितले

आकस बुद्धीने नेमलेली ही चौकशी समितीही महाविकास आघाडी व ठाकरे सरकारला चपराक आहे. कर्जत-जामखेडच्या आमदारांनी कर्जत व जामखेड तालुक्यातील जलयुक्त शिवारच्या कामांची चौकशी केली. त्यातही काही निष्पन्न झाले नाही. ही त्यांना बसलेली मोठी चपराक आहे, अशी टीका राम शिंदे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.