संभाजीराजेंना महाराष्ट्रातील 'या' अपक्ष आमदाराने जाहीर केला पहिला पाठिंबा

संभाजीराजे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
Sambhajiraje Chhatrapati Latest News
Sambhajiraje Chhatrapati Latest NewsSarkarnama

पुणे : अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणुक लढत असलेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांना राज्यातील पहिल्या आमदाराने पाठिंबा जाहीर केला आहे. उरण मतदारसंघाचे अपक्ष आमदार महेश बालदी (Mahesh Baldi) यांनी संभाजीराजेंच्या बाजूने मतदान करण्याची घोषणा केली आहे. यानंतर लगेच संभाजीराजेंनी आमदार बालदींच्या उरण येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आभार मानले. दरम्यान बालदी यांनी संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून पहिली स्वाक्षरीही केली आहे. (Sambhajiraje Chhatrapati Latest News)

Sambhajiraje Chhatrapati Latest News
'हॉटेलचे बिल एकनाथ शिंदे यांनी भरले आणि मुख्यमंत्री ठाकरे झाले!'

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी बालदी यांचे आभार मानले. तसेच राज्य समन्वयक अंकुश कदम व धनंजय जाधव यांनी महाराष्ट्रातील सर्व अपक्ष आमदारांना छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

आगामी १० जूनला राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून सध्याच्या संख्याबळानुसार दोन जागांवर भाजप, तर प्रत्येकी एका जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उमेदवार सहजपणे निवडून येईल. मात्र, सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे संख्याबळ नसल्याने या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. सर्वपक्षीय आमदारांना निवडून द्यावे, असे आवाहन संभाजीराजेंकडून करण्यात आले आहे.

Sambhajiraje Chhatrapati Latest News
संभाजीराजेंना अद्याप पाठिंबा नाही; अजित पवार आणि जयंत पाटील मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार

दरम्यान, संभाजीराजेंना राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पाठिंबा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचा दावा संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून करण्यात आला येत आहे. मात्र, याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

याबाबत सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्याप राष्ट्रवादीकडून संभाजीराजेंना पाठिंबा देण्यात आला नसून या सहाव्या जागेबाबतचा निर्णय राष्ट्रवादी ,काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र घेणार आहे. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे संभाजीराजेंचा खासदारकीचा मार्ग अद्यापही मोकळा झालेला नाही, असे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com