गृहमंत्र्यांच्या सचिवाच्या गाडीतून रोकडसह बॅग लंपास; फलटणमधील घटना

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील Dilip Walse Patil यांचे खासगी सचिव Private PA बाबासाहेब शिंदे हे फलटण Phaltan तालुक्यातील धुळदेव Dhuldev येथे दहा डिसेंबरला एका विवाह सोहळ्यासाठी आले होते.
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilsarkarnama

सातारा : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या खासगी सचिवाच्या गाडीतून रोख रकमेसह बॅग चोरीला गेली आहे. या चोरीच्या प्रकारामुळे फलटणमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खासगी सचिव बाबासाहेब शिंदे हे फलटण तालुक्यातील धुळदेव येथे दहा डिसेंबरला एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर शिंदे हे परत निघाले असता त्यांच्या गाडीची काच फोडल्याचे निदर्शनास आले.

Dilip Walse Patil
जमावबंदीत मोर्चा : वळसे पाटील म्हणाले, भाजप नेत्यांवर कारवाई करणार...

त्यांनी गाडीची तपासणी केली असता एक बॅग आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले आहे. या बॅगेत काही महत्वाची कागदपत्रेही असल्याचे त्यांनी सांगितले. ही चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गृहमंत्र्यांच्याच खासगी सचिवाची बॅग चोरीस गेल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. आता पोलिस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com