मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करा, असं म्हणायलाही ते कमी करणार नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली.
Governor Bhagat Singh Koshyari Latest Marathi News, MLA Rohit Pawar Latest News
Governor Bhagat Singh Koshyari Latest Marathi News, MLA Rohit Pawar Latest NewsSarkarnama

अहमदनगर - मुंबई संदर्भात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्यावर शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून टीका होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली. ( They will not hesitate to say that Mumbai should be separated from Maharashtra )

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, आगामी महापालिका निवडणूक डोळ्यापुढं ठेवून मुंबईसंदर्भात काल राज्यपाल महोदयांनी मांडलेला नवीन ‘सिद्धांत’ ऐकूण आश्चर्य वाटलं नाही. कारण आजवर आयएफएससी सेंटर, बुलेट ट्रेन, शिपयार्ड (ही लांबलचक यादी आहे) अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा वारंवार प्रयत्न झाला आहे, अशी टीका ही त्यांनी केली.

Governor Bhagat Singh Koshyari Latest Marathi News, MLA Rohit Pawar Latest News
रोहित पवार म्हणाले, हमारा भी टाईम आयेगा...

त्यांनी पुढे म्हंटले आहे की, आता तर मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय पण महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही. मुंबईचं आजचं स्थान हे सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे आहे. पण त्यात भेदभाव करुन मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करा, असं म्हणायलाही कदाचित भेदभाव करणारे कमी करणारा नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

वास्तविक सर्वांना सामावून घेण्याइतकं समुद्रासारखं विशाल मन मुंबई व महाराष्ट्राचं आहे.याचा गैरफायदा घेत समुद्राच्या काठावर राहणाऱ्या मोठ्या व्यक्तीकडून मराठी माणसाला कमी लेखण्याचा आणि भाषा व प्रांतवाद निर्माण करण्याचा होणारा प्रयत्न दुर्दैवी व महाराष्ट्राच्या भावना दुखावणारा आहे, असे त्यांनी सांगितले.

Governor Bhagat Singh Koshyari Latest Marathi News, MLA Rohit Pawar Latest News
रोहित पवार- राम शिंदे लढतीत सुरेश धसांचे महत्व कायम!

जबाबदार पदावरील व्यक्तीने वादग्रस्त वक्तव्ये करण्यापेक्षा विश्वासदर्शक ठरावासाठी तातडीने अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयाप्रमाणे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जनतेला मदत करण्याबाबत सरकारला तातडीने पत्र पाठवण्याची आज खरी गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com