Satara : पुणे जिल्ह्यातून येऊन सातारा जिल्ह्यात गुरगुरत्यात... शाहजीबापूंचा राष्ट्रवादीला टोला

मुख्यमंत्र्यांचे CM Eknath Shinde लाडके आहेत. मुख्यमंत्र्यांची शंभूराज Shambhuraj Desai यांच्यावर मायेची पाखर आहे. त्यामुळे पाटण Patan तालुक्याला काहीही कमी पडणार नाही.
Shahajibapu Patil, Ajit Pawar
Shahajibapu Patil, Ajit Pawarsarkarnama

कऱ्हाड : मंत्री शंभूराज देसाईंच्या गालावरुन त्यांच्या मातोश्रीने हात फिरवला हा मायेची उर्जा देणारा हात आहे. त्याच्या आशिर्वादाने पाटण जिंकलेले आहे. आता सातारा जिल्हा जिंकुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाचा भगवा झेंडा जिल्ह्याच्या गावागावात पोहोचवा. आता कोण मोठं नाही, कुणाला काय घाबरायचे नाही. पुणे जिल्ह्यातुन येवुन सातारा जिल्ह्यात गुरारुन जात्यात, हे बंद करुन आपलेच नेतृत्व सिद्ध करावे. आता सातारा जिल्ह्यात आम्ही दोघे शोले करुनच दाखवतो, असा टोला आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना मारला.

मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिनी आयोजीत कार्यक्रमात आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले, मी आणि शंभूराज देसाई कॉलेज पासुनचे मित्र आहे. पोलादी पुरुषांच्या परंपरेतील चौथी पिढी आज शंभूराज देसाईंच्या रुपाने पाटण मतदार संघासाठी कार्यरत आहेत. इतिहास घडवलेल्या सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यातील एखाद्या आईने एखादे लेकरु कुशीत धरावे, तसे या पाटण तालुक्याला शंभूराज देसाईंनी धरले आहे. ते मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत.

मुख्यमंत्र्यांची शंभूराज यांच्यावर मायेची पाखर आहे. त्यामुळे पाटण तालुक्याला काहीही कमी पडणार नाही. पंढरीच्या पांडुरंगांचा आशीर्वाद घेवुन मी शंभूराज व त्यांच्या पत्नीसाठी आलो आहे. विश्वाच्या पाठीवर अनेक नातीगोती जोडलेली असतात. त्यात आईचे नाते सर्वश्रेष्ठ आहे. शंभूराज यांच्या गालावरुन त्यांच्या मातोश्रीने हात फिरवला हा मायेची उर्जा देणारा हात आहे.

Shahajibapu Patil, Ajit Pawar
Satara : शहराबाहेर होणार नवे कारागृह; शंभूराज देसाईंनी प्रस्ताव देण्याची केली सूचना

त्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादने तुम्ही पाटण जिंकलेले आहे, आता सातारा जिल्हा जिंकुन एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाचा भगवा झेंडा जिल्ह्याच्या गावागावात पोहचवा. आता कोण मोठं नाही, कुणाला काय घाबरायचे नाही, कुणाच्या काय भानगडी नाहीत. लय झालं गुरगुर करायचे लय झालं. पुणे जिल्ह्यात येवुन सातारा जिल्ह्यात गुरारुन जात्यात, हे बंद करुन आपलेच नेतृत्व सिध्द करावे.

Shahajibapu Patil, Ajit Pawar
Patan : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, आम्ही इतिहास घडवला...

लोकनेत्यांचे सिंहासारखे राजकारण

इतिहास घडवलेल्या सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यातील काळ्या पत्थरातुन ७० वर्षापुर्वी एक वाघ डरकाळी फोडुन मुंबईला गेला, त्यांचे नाव बाळासाहेब देसाई, असे सांगुन आमदार पाटील म्हणाले, बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्राचे ते पोलादी पुरुष ठरले. राजकारण होतात, निवडणुका येतात-जातात, खुर्च्या मिळतात, निघुन जातात. मात्र मर्दासारखे हिंमतीने सिंहासारखी डरकाळी फोडत आवाज देवुन राजकारण करणारी माणसे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहेत. त्यात पोलादी पुरुष बाळासाहेब देसाईंचे नाव घ्यावेच लागेल.

Shahajibapu Patil, Ajit Pawar
Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारचा आदित्य ठाकरेंना दणका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com