किरण लहामटेंमुळे आमचा रेल्वेचा प्रकल्प गेला...

भाजपचे माजी आमदार वैभव पिचड ( Vaibhav Pichad ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) यांच्याविरोधात टीकेची तोफ डागली.
वैभव पिचड, डॉ. किरण लहामटे
वैभव पिचड, डॉ. किरण लहामटेसरकारनामा

अहमदनगर - सध्या पुणे-नाशिक जलदगती रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. ही रेल्वे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून जाणार होती. मात्र हा प्रकल्प राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्या संगमनेर तालुक्यातून गेला. या संदर्भात बोलताना भाजपचे माजी आमदार वैभव पिचड ( Vaibhav Pichad ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) यांच्याविरोधात टीकेची तोफ डागली. ( Therefore, the railway project went through Akole taluka ... )

वैभव पिचड म्हणाले, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या काळात सुरवात झाली. कोणताही प्रकल्प राबविताना भौगोलिक परिस्थिती पाहून लोकांच्या दळणवळणातील समस्या सुधारण्यासाठी प्रयत्न होत असतो. प्रत्येक नेत्याला आपल्याच मतदार संघात जास्तीत जास्त नवीन प्रकल्प यावेत यासाठी प्रयत्न सुरू असतात.

वैभव पिचड, डॉ. किरण लहामटे
वैभव पिचड म्हणाले, आमदार करणाऱ्यांचा अपमान करणाऱ्यांविषयी मी काय बोलू...

ते पुढे म्हणाले की, अकोले हा अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा मतदार संघ हा अकोले विधानसभा मतदार संघ आहे. अवळवाडी ते घाटघर अंतर 200 किलोमीटरचे आहे. मुंबई ते अकोले जेवढे अंतर आहे तेवढेच अहमदनगर ते अकोले अंतर आहे. येथे समतल भाग नाही. त्यामुळे रस्त्यासाठी जास्त पैसे लागतात. विकासकामांसाठी निधी जास्त लागतो. तेवढा निधी न मिळाल्याने विकासावर परिणाम होतो.

मी आमदार असताना पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचे शेवटचे सर्वेक्षण झाले. आम्ही रेल्वेच्या पिनबुकमध्ये देवठणचे स्टेशनची नोंद करून मान्यता आणली होती. पुढे सत्तांतर झाले. राजकीय चढाओढीमुळे मी केलेले काम हाणून पाडण्याचा प्रयत्न झाला. यातच आम्ही अकोले तालुक्यात आणलेली रेल्वेही गेली आणि देवठण स्टेशनही गेलं. तालुक्यात रेल्वे यावी यासाठी विद्यमान आमदारांनी पाठपुरावा करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तो केला नाही.

वैभव पिचड, डॉ. किरण लहामटे
वैभव पिचड म्हणाले, आम्ही चाळीस वर्षे विकासच केला...

प्रकल्प जरी केंद्र सरकारचा असला तरी 80 टक्के कामाची हमी राज्य सरकारने घेतली होती. त्यामुळे दुसऱ्या तालुक्यातील नेत्यांनी फेरबदल घडून आणले. त्यावेळी आमचे जागरूक आमदार काय करत होते? तालुक्यात रस्त्यांसाठी निधी कमी त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पाण्याचा एकही नवा प्रकल्प सुरू झालेला नाही. नवीन विद्युत प्रकल्प नाही. हे विद्यमान आमदारांचे अपयश आहे. मधुकरराव पिचडांच्या काळात पवन ऊर्जा तर माझ्या काळात सौर ऊर्जेचे प्रकल्प आले होते. सध्या अकोले तालुक्यातील वीज कपात झाली आहे. कुमशेत सारख्या ठिकाणी वीज जात नाही. जो शेतकरी कोरोना काळात दोन वर्षे घरातून बाहेर पडू शकला नाही. मजुरीला जाऊ शकला नाही. त्याने पैसे आणायचे कोठून आणि भरायचे कोठून, असा प्रश्न वैभव पिचड यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com