Congress : काँग्रेसमध्ये दोन गट पडणार; पृथ्वीराज चव्हाणांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांत संभ्रम

सुशीलकुमार शिंदे Sushilkumar Shinde यांनी चव्हाण Prithviraj Chavan यांना थेट जनाधार नसलेला नेता leader without mass support म्हणून डिवचले आहे. तर नाना पटोले Nana Patole यांनी चव्हाण यांना भाजपाची BJP फूस असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavansarkarnama

कराड : गांधी परिवाराचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गांधी परिवार आणि काँग्रेस संघटनेबद्दल घेतलेल्या भूमिकेमुळे आता राज्यातील काँग्रेसमध्ये दोन गट पडण्याची शक्यता आहे. या सगळ्या राजकीय घडामोडीत सामान्य काँग्रेस कार्यकर्ता मात्र, संभ्रमात पडल्याचे चित्र आहे.

राज्यातील काँग्रेसचा गेल्या 30 ते 35 वर्षाच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. पृथ्वीराज चव्हाण दिल्लीतील राजकारणात होते तरीही महाराष्ट्रातील प्रत्येक निर्णयात काँग्रेस पक्षश्रेष्ठी पृथ्वीराज चव्हाण यांना सहभागी करून घेत होते.

Prithviraj Chavan
राधाकृष्ण विखेंनी अशोक चव्हाणांचे केले भाजपत स्वागत : नाना पटोलेंना दिल्या कानपिचक्या

यातूनच पृथ्वीराज चव्हाण यांना थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाठवून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी चव्हाण यांच्या वरील विश्वास दाखवला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीतील काँग्रेस वर्तुळातून बाहेर पडलेले दिसत आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांचाही त्याना विरोध असल्याचं अनेकदा स्पष्ट झालं आहे.

Prithviraj Chavan
बाळासाहेब थोरातांनी विधानसभेत मांडला नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न

आता चव्हाण यांनी थेट गांधी घराण्याच्या विरोधात भूमिका घेतल्याने सगळ्यानाच धक्का बसला आहे. चव्हाण यांच्या या भूमिकेला आता काँग्रेसमधून विरोध होऊ लागला आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी चव्हाण यांना थेट जनाधार नसलेला नेता म्हणून डिवचले आहे. तर नाना पटोले यांनी चव्हाण यांना भाजपाची फूस असल्या गंभीर आरोप केला आहे.

Prithviraj Chavan
जब तक देश मे है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की ऑंधी,  तब तक कैसे बनेंगे प्रधानमंत्री राहूल गांधी 

त्यामुळे आता राज्यातील काँग्रेस मध्ये दोन गट पडणार असल्याच स्पष्ट आहे. अगोदरच कॉग्रेसची पीछेहाट होत असल्याने अस्वस्थ असलेला काँग्रेस कार्यकर्ता या नवीन संघर्षामुळे आणखीच संभ्रमात पडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in