Sangola News : आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील ‘या’ कामाची होणार चौकशी

Shahaji Bapu Patil: शेकापकडून करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे.
Shahaji Bapu Patil
Shahaji Bapu PatilSarkarnama

Solapur News: आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांचा मतदारसंघ असलेल्या सांगोला (Sangola) तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमिता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या (PWP) नेत्यांनी केला होता.

शेकापचे नेते बाबासाहेब करांडे, बाळासाहेब काटकर, संगम धांडोरे यांच्यासह इतर नेत्यांनी आरोप करत या योजनेतील निविदा प्रक्रिया व कामांचा दर्जा याची चौकशी करण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय शेकापने घेतला आहे. शेकापकडून करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सोलापूर (Solapur) जिल्हा परिषदेचे (ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. (There will be an inquiry into the works of Jaljeevan Mission Yojana in Sangola)

Shahaji Bapu Patil
Sushilkumar Shinde Meets Jayant Patil : सुशीलकुमार शिंदे-जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड अर्धा तास ‘चाय पे चर्चा’

सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे व लेखाधिकारी कैलास कुंभार या तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती दोन दिवसांमध्ये या चौकशीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना देणार आहे.

सांगोला तालुक्यातील लक्ष्मी नगर, कटफळ, वाटंबरे, वाणीचिंचाळे, मांजरी, धायटी, एकतपूर व आचकदाणी या आठ गावांमधील जलजीवन मिशनच्या कामांची बिले काढण्यात आली आहेत. कामे न करता बिले काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आठ गावांसाठी अंदाजे ४ कोटी रुपयांची बनावट बिले काढल्याचा आरोप शेकापने केला आहे. शेकापने केलेलेल्या आरोपांची शहनिशा करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून योजनेबद्दल असलेला संभ्रम दूर केला जाणार आहे.

Shahaji Bapu Patil
Praniti Shinde News : काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद पेटला : प्रणिती शिंदे म्हणतात, ‘कोण रोहित पवार..? पोरकटपणा असतो काही लोकांत...’

शेकापने केलेल्या आरोपांची पडताळणी ही समिती करणार आहे. समितीच्या अहवालात कोणी दोषी असल्याचे आढळल्यास त्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. समितीचा अहवाल आल्यानंतर शेकापच्या पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा करणार आहोत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी येत आहे. या निधीतून चांगली कामे व्हावीत यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com