Gopichand Padalkar : ... तर लंकेची लंका जाळायला इथं बरीच लोक आहेत

गोपिचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली.
Gopichand Padalkar Latest News
Gopichand Padalkar Latest NewsSarkarnama

Gopichand Padalkar : भाजपचे विधानपरिषद आमदार तथा धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) हे एका कार्यक्रमानिमित्त पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे आले होते. या प्रसंगी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली.

गोपिचंद पडळकर म्हणाले, चौंडी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यभूमी आहे. तिथे ज्यांनी राजकारण केले त्यांची माती झाली. त्यातील दोघांची नावे मी सांगतो. एक ज्येष्ठ नेते शरद पवार व दुसरे त्यांचे नातू रोहित पवार. या दोघांनी चौंडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात राजकारण केले आणि 20 दिवसांत सरकार गेलं. मी आल्यावर त्यांना चौंडीतून पळून जावं लागलं, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Gopichand Padalkar Latest News
गोपिचंद पडळकरांना उभा करून बारामती जिंकून दाखवतो - मुख्यमंत्री

ते पुढे म्हणाले की, रावणाची लंका एकट्या हनुमानाने जाळली. या लंकेची लंका जाळायला इथं बरीच लोक आहेत. पवारांना बरं वाटाव म्हणून माझ्यावर बोलतो. मी अशा लोकांना किंमत देत नाही. मी पवार सोडून खाली अजिबात येत नाही. प्रत्येक अपमानाची गोष्ट डोक्यात ठेवायची. त्यांनी जेजुरी, चौंडीत राजकारण केलं, असे त्यांनी सांगितले.

Gopichand Padalkar Latest News
Video : 'गोपीचंद पडळकर यांच्याकडून 'चौंडी' येथे घाणेरडे राजकारण'

यादेशात लोकशाही प्रस्थापित झाली. पूर्वी राणीच्या पोटातून येणारा राजा राजगादीवर बसायचा. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राणीच्या पोटातून राजा जन्माला येणे बंद केले. गावगाड्यातील सामान्य माणूस सुद्धा लोकशाहीत राजा होऊन खुर्चीत विराजमान होण्याची संधी दिली. लोकशाहीतही घराणेशाही जन्माला आली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com