या तर चोराच्या उलट्या बोंबा; उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना प्रतिउत्तर...

शिवेंद्रसिंहराजेंनी Shivendraraj Bhosale काल उदयनराजेंच्या इनोव्हेटिव्ह सातारा Inovative satara योजनेची खिल्ली उडवत पालिका निवडणुकीपूर्तीच ही योजना असल्याची टीका केली होती. त्याला उदयनराजेंनी Udayanraje Bhosale सडेतोड उत्तर दिले आहे.
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosaledesign@apglobale.com

सातारा : सातारकरांच्या उज्वल भविष्यासाठी सुरू केलेली 'इनोव्हेटिव्ह सातारा' योजना ही समाजाची आणि समाजहित साध्य करुन घेण्याची चिरकाल चालणारी योजना आहे. पण, लोकांच्या गतीमान सोयी, सुविधांसाठी योजना राबवून तिची अंमलबजावणी करणे ही जर भ्रष्टाचाराची व्याख्या असेल तर होय.. आम्ही भ्रष्टाचार केलाय. पण, स्वार्थ्यांध भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असे प्रतिउत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले आहे.

सातारकरांच्या उज्वल भविष्यासाठी सुरू केलेली 'इनोव्हेटिव्ह सातारा' योजना चिरकाल चालणारी आहे. ज्यांना इनोव्हेटिव्ह सातारा या शब्दाचा अर्थ आणि या शब्दाचे स्पेलिंग अचुक सांगता येणार नाही, त्यांनी आमच्या या उपक्रमाविषयी काही बोलु नये, असे स्पष्ट करून उदयनराजे म्हणाले, सर्वसामान्य जनतेसाठी आजपर्यंत आम्ही जीवन व्यथित केले आहे. काहींना आमची धडाडी आणि लोकप्रियता खुपत आहे. म्हणूनच कथित भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप ते करत आहेत.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
दोन्ही राजे आमचेच...सातारा पालिकेचा निर्णय फडणवीस घेतील...

लोकांच्या गतीमान सोयी, सुविधांसाठी कोणत्या योजना राबविणे, लोकहिताची अंमलबजावणी करणे ही जर भ्रष्टाचाराची व्याख्या असेल तर होय.. आम्ही भ्रष्टाचार केलाय. पण, स्वार्थ्यांध भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. सहकाराचा गळा घोटुन स्वाहाकार करुन आता रियल इस्टेटमध्ये घुसलेल्या व्यक्तींनी आजपर्यंत फक्त स्वार्थ पाहिला आहे. स्वार्थ नसेल तर त्यांचा कोणताही उपक्रम होत नाही, अशा व्यक्तींना निस्वार्थीपणे नागरीकांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींची वाढती लोकप्रियता सहन होणारी नाही. म्हणून ते नेहमीच कुरकूर करत असतात.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
उदयनराजेंना पराभव दिसू लागलाय म्हणूनच...

समाजासाठी जगणारी व्यक्ती म्हणून उदयनराजे हे उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. कुणी कितीही उलट्या बोंबा मारत असले तरी त्या बोंबा मारणा-यांना समाजाने पुरते ओळखले आहे, असे सांगून उदयनराजेंनी म्हटले की, शाश्वत विकासाच्या गप्पा ठोकणा-यांनी, सहकारी संस्था चालवता आल्या नाहीत, म्हणून दोन बँकांचे विलिनीकरण केले. तरीही उजळ माथ्याने हिंडणा-यांचा सहकारातील अचंबित करणारा शाश्वत विकास सभासद, नागरीकांनी पाहिला आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Video : खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा कार्यक्रमात उडवली कॉलर...

त्यांचे 'पोटात एक आणि ओठात एक' या वैशिष्ठयाचा अनेकांना झटका बसला असून ते लोक विसरलेले नाहीत, असे स्पष्ट करून उदयनराजेंनी पुढे म्हटले की, बेछुट, बेताल आरोप करुन त्यांचा सुरु असलेला चारित्र्यहनणाचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. त्यांच्या वक्तव्याला आम्ही फारशी किंमतही देत नाही. संबंधितांना आरोपच करायचे असतील तर पुराव्यानिशी आणि चार-चौघात चर्चेला सामोरे जाऊन, सिध्द करुन दाखवावेत, असे आमचे आव्हान आहे. खऱ्याला मरण नाही, हा सूर्य आणि हा जयद्रथ करायला आम्ही तयार आहे, असे आव्हान त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com