‘...तर सोलापुरातील ९३ वर्षांची जुनी ‘लक्ष्मी बँक’ वाचली असती’

सोलापुरातील ९३ वर्षांची बँक बुडीत निघाल्याने अनेकांनी दुःखंही व्यक्त केलं आहे. काही ठेवीदार आज सकाळी आपल्या रकमा काढण्यासाठी बँकेत आल्याचं चित्र पाहायला मिळालं. काहींच्या भावना अनावर होत बँकेसमोर आपला रोष व्यक्त केला.
Laxmi Bank
Laxmi BankSarkarnama

सोलापूर : पुरेसे भांडवल नाही आणि भविष्यात ते वाढण्याची शक्यता नाही, हे कारण देऊन रिझर्व्ह बँकेने सोलापुरातील (Solapur) पहिली सहकारी बॅंक (Bank) असलेली जुनी ९३ वर्षांच्या दी लक्ष्मी सहकरी बॅंकेचा परवाना रद्द केला आहे. लक्ष्मी बँकेचा परवाना रद्द झाल्याने आज (ता. २३ सप्टेंबर) सकाळी ठेवीदारांनी बँकेसमोर येऊन आपला आक्रोश व्यक्त केला. बॅंकेवर नियुक्त असलेल्या नागनाथ कंजेरी यांनीही माध्यमांसमोर दुःख व्यक्त केले. बँक वाचवण्यासाठी नोव्हेंबर २०२१ पासून प्रयत्न करण्यात येत होते. लक्ष्मी बॅंक पुण्यातील पीपल्स बँकेत विलीनीकरणासाठी प्रयत्न सुरू होते. त्यादृष्टीने सकारात्मक वाटचाल सुरू होती. मात्र, अचानकपणे आरबीआयचा आदेश धडकला आणि बँकेचा ९३ वर्षांचा प्रवास एका झटक्यात थांबला. (‘.. Then the 93-year-old 'Lakshmi Bank' in Solapur would have survived’)

सोलापूर शहरातील पहिली सहकारी बँक म्हणजे दी लक्ष्मी सहकारी बँक होय. जवळपास ९३ वर्षांपूर्वी या बँकेची स्थापना झाली होती. आरबीआयने दोन कारणे देऊन बँकेचा परवाना रद्द केला आहे. पाहिले कारण बँकेकडे पुरेसा भांडवल नाही, दुसरे कारण म्हणजे कमाईची शक्यता नाही. आरबीआयच्या आदेशाने लक्ष्मी सहकारी बँकेतील १०० कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे. सोलापुरातील पहिली बँक बुडीत निघाल्याने अनेकांनी दुःखंही व्यक केलं आहे. काही ठेवीदार आज सकाळी आपल्या रकमा काढण्यासाठी बँकेत आल्याचं चित्र पाहायला मिळालं. काहींच्या भावना अनावर होत बँकेसमोर आपला रोष व्यक्त केला.

Laxmi Bank
महाडिक गटाला धक्का; सतेज पाटील गटाची सरशी : राजाराम कारखान्याचे १३२६ सभासद अपात्र

रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर-२०२१ मध्ये लक्ष्मी सहकारी बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ नियुक्त केले होते. सप्टेंबर २०२२ रोजी बँकेचा परवाना रद्द झाल्याने प्रशासकीय मंडळ बरखास्त करून सहकार विभाग अवसायक मंडळ नियुक्त करणार आहे. हे अवसायक मंडळ बँकेच्या थकीत कर्जे १० वर्षांत वसूल करणार आणि दहा वर्षांनंतर बँक इतिहास जमा होणार आहे.

Laxmi Bank
एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट; राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा असा ठरला फॉर्म्युला?

दरम्यान, नोव्हेंबर २०२१ पासून लक्ष्मी बँकेवर असलेल्या प्रशासक मंडळाने पाच लाखांपर्यंतच्या ठेवींच्या रकमा अदा केल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी नागनाथ कंजेरी यांनी दिली. मात्र, पाच लाखांवरील ठेवीदारांचा प्रश्न अजूनही तसाच राहिला आहे. पाच लाखांवरील ठेवी रकमा जवळपास २५ कोटी अडकून पडल्या आहेत. पाच लाखांवरील ठेवीदारांच्या रकमा देण्याची जबाबदारी आता अवसायक मंडळाची आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com