... तर मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतणार : किसान सभेचा इशारा

किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले ( Dr. Ajit Nawale ) यांनी राज्यातील मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Dr. Ajit Nawale
Dr. Ajit NawaleSarkarnama

अहमदनगर - नाफेडने राज्यातील हरभरा खरेदी बंद केली आहे. त्यामुळे राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे तर किसान सभा राज्य सरकार विरोधात आक्रमक झाली आहे. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले ( Dr. Ajit Nawale ) यांनी राज्यातील मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. ( ... then a gram will be poured at the door of the minister: warning of Kisan Sabha )

डॉ. अजित नवले म्हणाले की, खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करून दिलेल्या मुदतीपूर्वीच नाफेडने हरभरा खरेदी बंद केली आहे. हरभरा उत्पादक शेतकरी सरकारच्या या कृतीमुळे हवालदिल झाले आहेत. राज्यभर खरेदी केंद्रांवर हजारो वाहने उभी असताना अचानक खरेदी बंद केल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे.

Dr. Ajit Nawale
पुणतांब्यातील शेतकरी शिष्टमंडळाची शरद पवार यांच्याशी चर्चा 

ते पुढे म्हणाले की, वाहनांचे भाडे दररोज वाढत असून नाईटचार्ज भरावा लागत असल्याने व खरेदी होईल याची शाश्वती नसल्याने शेतकरी काकुळतीला आले आहेत. राज्यात नाफेड द्वारे 5 हजार 230 रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरु होती. खुल्या बाजारात 4200 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विकण्याचा पर्याय निवडला होता.

Dr. Ajit Nawale
Video : वाईन नाहीतर दुधाला प्राधान्य द्या : अजित नवले

नाफेडकडे रितसर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एस.एम.एस. पाठविण्यात आले होते. रितसर एस.एम.एस. आलेल्या शेतकऱ्यांनी वाहने भाड्याने करून आपला माल खरेदी केंद्रांवर आणला असताना आता खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण सांगून खरेदी नाकारली जात आहे. शेतकऱ्यांमध्ये यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे. 23 मे रोजी अचानक खरेदी बंद झाल्यामुळे केंद्रांवर आणलेल्या मालाचे काय करायचे असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने हरभरा खरेदी पुन्हा सुरू करावी तथा राज्य सरकारनेही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांबाबत योग्य पावले उचलावीत, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा किसान सभेने दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com