अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांत वाहू लागलेय निवडणुकीचे वारे

अहमदनगर महापालिका ( Ahmednagar Municipal Corporation ) कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे राजकारण रंगू लागले आहे.
Political party
Political partySarkarnama

अहमदनगर : अहमदनगर महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे राजकारण रंगू लागले आहे. मागील सुमारे 25 वर्षांपासून अहमदनगर महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या राजकारणात किंगमेकर असलेल्या कैलास भोसले यांनाच आव्हान देण्यासाठी त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे कैलास भोसले नव्याने तयार करीत असलेला पॅनल विजयी होणार की भोसलेच्या जुन्या सहकाऱ्यांनी भरलेला सहकार पॅनल विजय होणार यावर आता महापालिकेत उलट सुलट चर्चा रंगू लागली आहे. The winds of election have started blowing among the employees of Ahmednagar Municipal Corporation

Political party
अखेर नगर महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

अहमदनगर महापालिका कर्मचारी संघटनेवर अनंत लोखंडे तर अहमदनगर महापालिका कर्मचारी पतसंस्थेवर कैलास भोसले असे जणू समीकरण तयार झाले होते. मागील निवडणुकीतही कैलास भोसले यांच्या जनसेवा पॅनलने विजय मिळविला होता. पतसंस्थेत 15 संचालक असतात. त्यातील 13 संचालक एकट्या जनसेवा पॅनलचे होते. परिवर्तन पॅनलकडे दोनच संचालक होते. मात्र या पॅनलमधील 11 संचालकांनी तीन वर्षांपूर्वी वेगळे होत सत्ता मिळविली. यात त्यांनी परिवर्तन पॅनलच्या शेखर देशपांडे यांनाही बरोबर घेतले. यातील दोन संचालकांचा कोरोना काळात मृत्यू झाला. एक संचालक निवृत्त झाले आहेत.

एक हाती विजयी झालेला जनसेवा पॅनल फुटणे हा भोसलेंसाठी मोठा धक्का होता. सलग 25 वर्षांच्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेतील राजकारणात विजयी होऊनही पराभव पहावा लागल्याने नंतर काही काळ त्यांनी पतसंस्थेत लक्ष देणे सोडून दिले.

Political party
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

आता पुन्हा अहमदनगर महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजणार असल्याने ते सक्रिय होऊ पाहत आहेत. मात्र त्याच वेळी त्यांच्या पॅनलमधून बाहेर पडलेल्या 9 संचालकांनी परिवर्तनच्या शेखर देशपांडेंना बरोबर घेत सहकार नावाचा नवा पॅनल उभा केला आहे. अहमदनगरमध्ये नगरपालिका असल्या पासून भोसले यांचाच पॅनल विजय होत आला आहे. महापालिका स्थापन करताना शहरा शेजारील गावेही महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. तेथील कर्मचारी महापालिकेत रूजू झाले तरीही भोसलेचे पॅनल विजयीच होत आले आहे. यंदा मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही.

मतदार यादी कार्यक्रम जाहीर असतानाच सहकार पॅनलने सर्व उमेदवार निश्चित करत निवडणुकीचा प्रचारही सुरू केला आहे. या पॅनलमध्ये किशोर कानडे, बाबा मुद्गल, विकास गिते, जितेंद्र सारसर, बाळासाहेब गंगेकर, बाळासाहेब पवार, शेखर देशपांडे, सतीश ताठे व अजय कांबळे हे जुने संचालक तर प्रतिमा पवार, उषा वैराळ, गुलाब गाडे, विजय कोतकर, कैलास चावरे, बलराज गायकवाड या नवख्यांनाही उमेदवारी देण्यात येणार आहे. यातील भोसले यांचे अनुभवी व दिग्गज साथीदार त्यांना सोडून सहकार पॅनलमध्ये दिसत आहेत. जितेंद्र सारसर व बाळासाहेब पवार हे तर 25 वर्षांपासून संचालक आहेत. तर उर्वरित सात जुन्या संचालक 2008पासून सत्तेत आहेत. त्यामुळे सध्या तरी सहकार पॅनलचे पारडे थोडे जड पडू लागले आहे.

Political party
आमदार रोहित पवारांनी एकाच बाणात केले अनेक पक्षी घायाळ...

सहकार पॅनलने जुन्या नव्याचे मिश्रण केले आहे. दुसरीकडे कैलास भोसले यांच्या पॅनलमध्ये त्यांचे जुने सहकारी असलेले संचालक प्रकाश आजबे व परिवर्तन पॅनलच्या नंदा भिंगारदिवे दिसतील. भोसले यांना उर्वरित 12 नवीन उमेदवार द्यावे लागतील. त्यामुळे सहकारच्या मानेने काहीशी तरूण व नवख्यांची फौज घेऊन भोसले यांना निवडणूक लढवावी लागणार आहे. या निवडणुकीत भोसले यांचे पॅनल सतत विजयी करण्याची मालिका सहकार पॅनल तोडेल की भोसले त्यांची विजयी मालिका पुढेही सुरूच ठेवतील हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी मात्र सध्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांत निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com