Satara : उदयनराजेंचे वर्चस्व असलेल्या भागाचा पाणीप्रश्न शिवेंद्रसिंहराजेंनी सोडविला...

आमदार MLA शिवेंद्रसिंहराजे Shivendraraje Bhosale यांनी सातारा पालिकेची Satara Palika हद्दवाढ मंजूर करून त्रिशंकू भागाला Third Cone area विकासाच्या प्रवाहात आणले.
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosalesarkarnama

सातारा : त्रिशंकू भागातील समस्या सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे शाहूनगर आणि विलासपूर भागाचा पाणीप्रश्न कायमचा सुटला आहे. शाहूनगर आणि विलासपूरसाठी स्वतंत्र, विस्तारित आणि परिपूर्ण पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाकडून तब्ब्ल ३२ कोटी ३२ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्रिशंकू भागावर खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाचे वर्चस्व आहे.

मुंबई येथे सोमवारी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरविकास विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ व इतर संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेऊन शाहूनगर आणि विलासपूरसाठीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसंबंधाने सविस्तर चर्चा करून अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला.

शाहूनगर, विलासपूर या भागात गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. लोकसंख्या वाढीमुळे आणि जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्यामुळे या भागातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असे. ही समस्या सोडविण्यासाठी नवीन विस्तारित पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली पाहिजे यासाठी शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता. नवीन योजनेला मंजुरी मिळाल्याने त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Satara : शेतकऱ्यांकडे दूर्लक्ष नको.. अन्यथा, हातात वाडगं घेऊन बसावे लागेल... उदयनराजे भडकले

या योजनेसाठी नगरोत्थानमधून ३२ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून या निधीतून कृष्णा नदीवर नवीन जॅकवेल, इंटेक वेल, दाब नलीका, गुरुत्व नलिका, विसावा नाक येथे अद्ययावत जलशुद्धीकरण केंद्र, शाहूनगर, विलासपूर येथे चार नवीन पाणीसाठवण टाक्या उभारण्यात येणार आहेत. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे शाहूनगर आणि विलासपूर भागात सुमारे ६० किलोमीटर परिसरात पूर्णपणे नवीन जलवाहिन्या टाकून स्वतंत्र आणि नवीन पाणी वितरण व्यवस्था केली जाणार आहे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Satara : शिवाजी महाराजांचे स्मारक सातारा पालिकेकडे हस्तांतरीत करा... शिवेंद्रसिंहराजे

यामुळे शाहूनगर आणि विलासपूर परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळणार असून या भागातील नागरिकांनाचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा पालिकेची हद्दवाढ मंजूर करून त्रिशंकू भागाला विकासाच्या प्रवाहात आणले. आता नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लावल्याने त्रिशंकू भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
सातारा पालिकेत ५० जागा जिंकणार; मिशीला पीळ, ताव मारून होत नसतं... उदयनराजे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in