तिघाडी सरकारचे शिलेदार गुळाला लागलेल्या मुंगळ्यासारखे खुर्चीला चिकटलेत

भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
तिघाडी सरकारचे शिलेदार गुळाला लागलेल्या मुंगळ्यासारखे खुर्चीला चिकटलेत
Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Murkute, Vitthalrao LangheSarkarnama

सोनई ( जि. अहमदनगर ) - नेवासे तालुका भारतीय जनता पक्षातर्फे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याने संघटनात्मक बैठक घेण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ( The trio of government sticks to the chair like jaggery )

लक्ष्मी मंगल कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत बूथ सक्षमीकरण पर्व, सुशासन पर्व व गरीब कल्याणकारी पर्व पंधरवडा बाबत चर्चा करण्यात आली. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, 'भाजप'चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी व शहराध्यक्ष मनोज पारखे यांचे भाषण झाले.

Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Murkute, Vitthalrao Langhe
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच केंद्र सरकारच्या योजनांचे श्रेय घेतेय

प्रमुख भाषणात विखे पाटील यांनी केंद्र सरकार राबवत असलेल्या महत्वपूर्ण 78 योजनांची माहिती देवून महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणावर टीका केली. ते म्हणाले, गुळाच्या ढेपीला मुंगळे चिटकून बसतात त्याप्रमाणे तिघाडी सरकारचे शिलेदार खुर्चीला चिटकून बसले आहेत. असा टोला लगावला.

Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Murkute, Vitthalrao Langhe
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मला आदित्य ठाकरे यांची कीव वाटते...

शेतकरी हिताचे सरकार म्हणून दिंडोरा पिटविला जात असला तरी प्रत्यक्षात आघाडीची भुमिका शेतकऱ्यांना मातीत गाडत आहे. विजेचा प्रश्न व फसव्या कर्जमाफीने त्यांचा बुरखा फाटला आहे, अशी टीका त्यांनी केली.

यावेळी बाळासाहेब भदगले, अण्णासाहेब अंबाडे, बाळासाहेब देवखिळे, देविदास साळुंखे, कैलास दहातोंडे सह कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in