पुणतांब्यात शेतकरी आंदोलनाची पेटली मशाल : राज्य सरकार समोर नवा पेच

पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा पुणतांब्यात शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केल्याने राज्य सरकार समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
पुणतांब्यात शेतकरी आंदोलनाची पेटली मशाल : राज्य सरकार समोर नवा पेच
Puntamba Farmers agitation News, Puntamba Farmer NewsSarkarnama

अहमदनगर - पुणतांबा ( ता. राहाता ) येथे शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी शेतकऱ्याच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत व आंदोलनाची मशाल पेटवत हे पाच दिवसीय आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा पुणतांब्यात शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केल्याने राज्य सरकार समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. ( The torch of farmers' agitation in Puntambe: A new dilemma before the state government )

राज्यात शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. ऊस, कांदा प्रश्न अधिक गंभीर होत असताना राज्य व केंद्र सरकार शेतकरी प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी एकमेकांवर चालढकल करत असल्याचे सांगत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजपासून (ता. 1 जून) पुणतांबा (ता. राहाता) येथे शेतकरी, गावकऱ्यांना धरणे आंदोलन सुरू केले आहे. (Puntamba Farmers agitation News Updates)

Puntamba Farmers agitation News, Puntamba Farmer News
राज्यात पुन्हा शेतकऱ्यांचा संप? : पुणतांब्यात सोमवारी ठरणार व्यूहरचना

शासनाला मागण्याचे निवेदन दिल्यानंतरही दखल घेतली नसल्याने अंदोलनाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. हे धरणे आंदोलन 5 जूनपर्यंत चालेल. तोपर्यंतही दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र होणार आहे. पाच वर्षापूर्वी या गावांतून एतिहासिक शेतकरी संपाला सुरवात झाली आहे.

राज्यात सध्या ऊस, कांदा दर, वीज, दूध आदीसह शेतमालाच्या दराचा प्रश्न वरचेवर अधिक गंभीर असताना शेतकरी प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी केंद्र व राज्य सरकार एकमेकांवर चालढकल करत आहेत. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी एतिहासिक शेतकरी संप पुकारणाऱ्या पुणतांबे (ता. राहाता) येथील गावकऱ्यांनी पुन्हा एकदा शेतकरी प्रश्नावर एल्गार पुकारला आहे. पंधरा दिवसापूर्वी बैठक घेऊन व 23 मे रोजी ग्रामसभा घेऊन उसाला एकरी एक हजार रुपये अनुदान द्यावे, शिल्लक उसाला हेक्टरी दोन लाख रुपये द्यावे आदी ठराव घेतले.

Puntamba Farmers agitation News, Puntamba Farmer News
नाना पटोले म्हणाले, संकटात असलेल्या हिमालयाला सह्याद्री वाचविण्यासाठी जाणार...

शासनाला सात दिवसांची मुदत दिली होती, मात्र मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने आज (बुधवारी) गावकऱ्यांनी धरणे अंदोलन सुरु केले आहे. प्रारंभी गावांतून रॅली काढून व मशाल पेटवून शेतकरी पुतळ्याला दुग्धाभिषेक केला आणि धरणे आंदोलनाला सुरवात झाली. आंदोलनात सुभाष कुलकर्णी, सुहास वहाडणे, सुभास वहाडणे, संगीता भोरकडे, ॲड. विजय सदाफळ, अॅड. चांगदेव धनवटे, धनंजय जाधव, बाळासाहेब चव्हाण, नामदेव धनवटे यांच्यासह इतरांची भाषणे झाली. धरणे आंदोलनात परिसरातील गावातील महिला, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in