NCP
NCP Sarkarnama

राष्ट्रवादी गटनेत्यावर प्राणघातक हल्ला; आमदार राऊतांच्या भावासह तिघांना कोठडी

Solapur News : राष्ट्रवादीचे नेते नागेश अक्कलकोटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.

प्रशांत काळे

Solapur News : मागील आठ वर्षापूर्वी बार्शी नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे (NCP) तत्कालीन नगरसेवक गटनेते नागेश अक्कलकोटे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी माजी नगरसेवक तथा आ. राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांचे बंधू तसेच तत्कालीन गटनेते विजय राऊतांसह तिघांना न्यायदंडाधिकारी जे. ए. झारी यांनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

माजी नगरसेवक विजय राऊतांसह दिपक ढावारे, रणजित चांदणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. याप्रकरणी उच्च न्यायालयाने संशयित आरोपींचा जामिन फेटाळला होता. त्यामुळे अखेर विजय राऊत यांच्यासह दिपक ढावरे आणि रणजित चांदणे हे शनिवारी (ता.१९) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बार्शी शहर पोलीस ठाण्यात हजर झाले होते. तब्बल तीन तासाच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर तिघांना अटक करण्यात आली.

NCP
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींना आवरला नाही भजी तळण्याचा मोह ; सोलापुरी जेवणाचा घेतला आस्वाद!

काय आहे प्रकरण

1 ऑगस्ट 2014 रोजी नागेश अक्कलकोटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. घटनेनंतर बार्शी पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला प्रकरणी विजय राऊत, दिपक राऊत, सोन्या हाजगुडे, मुन्ना बोते, डंग्या यादव, दिपक धावारे, रणजित चांदणे, प्रकाश राऊत, विशाल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. उच्च न्यायालयाने जामिन फेटाळल्याने आरोपींना अखेर अटक होण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

माजी नगरसेवक विजय राऊत, दिपक ढावरे, रणजित चांदणे शनिवारी दुपारी बाराच्या दरम्यान बार्शी शहर पोलिस ठाण्यात हजर झाले पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करुन बार्शी न्यायालयात दुपारी साडेचारच्या दरम्यान न्यायालयासमोर उभा केले. ही घटना अवघ्या काही क्षणात शहरभर पसरली होती.

NCP
म्हणून सोमय्यांना कोल्हापुरात बंदी घातली होती; सतेज पाटलांनी सांगितले कारण

सरकारपक्षाच्यावतीने सरकारी वकील अॅड. प्रसाद कुलकर्णी यांनी बाजू मांडली तर संशयित आरोपींच्या वतीने अॅड सागर रोडे यांनी युक्तीवाद केला. सुमारे आर्धा तासाच्या सुनावणीनंतर न्यायाधीशांनी संशयित विजय राऊत यांचेसह इतर दोघांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com