गडाखांची तिसरी पिढी झाली सक्रीय : राजकारण आणि शैक्षणिक जबाबदारी

जेष्ठ नेते यशवंतराव गडाख ( Yashwantrao Gadakh ) यांच्यानंतर गडाख कुटूंबाची तिसऱ्या पिढी राजकारण व समाजकारणात सक्रीय झाली आहे.
उदयन गडाख व नेहल गडाख
उदयन गडाख व नेहल गडाखसरकारनामा

सोनई (अहमदनगर) : जेष्ठ नेते यशवंतराव गडाख ( Yashwantrao Gadakh ) यांच्यानंतर तिसऱ्या पिढीतील उदयन गडाख यांचा राजकीय मैदानात यशस्वी उदय झाल्यानंतर आता प्रशांत गडाख यांची कन्या नेहल हिने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले आहे. नेवासे तालुक्यात 'नवी पिढी नवी जबाबदारी'चे स्वागत होत आहे. The third generation of Gadakhs became active: politics and educational responsibility

जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे नातू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांचे चिरंजीव उदयन सध्या तालुक्यातील सुखदुःखात सहभागी होत मंत्री गडाखांचे काम हलके करत आहेत.त्यांनी केलेले युवा संघटन संघटनेला लाभदायक ठरत आहे.प्रशांत यांच्या पठडीत तयार झालेला उदयन सध्या युवकांबरोबरच जेष्ठांचाही प्रिय झाला आहे. संपर्क, भेटीगाठी आणि कामांचा पाठपुरावा मार्गी लागत असल्याने संघटनेचे बळ निश्चितच वाढले आहे.

उदयन गडाख व नेहल गडाख
यशवंतराव गडाख यांनी सवंगड्यांसह घेतला आमटी, भाकरीचा आस्वाद

युवानेते गडाख यांची नव्याने मुळा एज्युकेशन संस्थेच्या उपाध्यक्षपदी तर प्रशांत यांची कन्या नेहल हिच्यावर स्व.यशवंतराव चव्हाण मेमोरियल च्या विश्वस्तपदाची जबाबदारी पडली आहे.निवड झालेल्या दोन्ही संस्था मोठ्या असुन राज्यात नाव आहे.नवा गडी नवे राज्य प्रमाणे नव्या निवडीचे शिक्षकवृंद, कर्मचारी, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांतून स्वागत होत आहे.राजकीय व शैक्षणिक वाटचालीची सर्वाना उत्सुकता लागली आहे.

नेवासे तालुका पूर्वी नगर आणि शेवगाव विधानसभा मतदार संघासाठी जोडलेला होता. शेवगाव आणि नगर तालुक्यातीलच आमदार निवडून जायचे आणि नेवासे तालुक्याची फरफट ठरलेली असायची. नेवासे स्वतंत्र विधानसभा मतदार संघ होवून पहिले आमदार गडाख झाले. त्यांनी रस्ते,वीज व जलसंधारणचे मोठे काम केले होते. शासनाच्या निधीशिवाय त्यांनी 2013 मध्ये तीन कोटी रुपयांहून अधिक खर्च करीत 300 पाणी साठवण बंधारे, पाझर तलाव, गावतळी व साखळी बंधाऱ्याची दुरुस्ती, खोलीकरण, रुंदीकरण व गाळ काढला होता.दुष्काळी कामाचा हा नेवासे पॅटर्न राज्यात चर्चेत आला होता.या केलेल्या कामाचा फायदा आजही शेतकऱ्यांना होत आहे. अशीच दृष्टी उदयन गडाख मध्ये असल्याचे बोलले जात आहे.

उदयन गडाख व नेहल गडाख
उदयन गडाखांची मुळा संस्थेत एंट्री : उपाध्यक्षपदी निवड

यशवंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी सामाजिक,शैक्षणिक व सेवाभावी कार्यात उल्लेखनीय काम केले मात्र त्यांची खरी ओळख राजकीय आराखडे व परफेक्ट नियोजनकर्ता म्हणून आहे. मरणोत्तर नेत्रदान, वृक्षारोपण, गाव तेथे वाचनालय, गरजू मुलींचे शैक्षणिक पालकत्व असे मोठे उपक्रम दिशादर्शक ठरले आहेत. त्यांची कन्या नेहल हिच्यावर वैद्यकीय शिक्षण संस्थेची जबाबदारी पडली असुन याही क्षेत्राला यशाची प्रकाशवाट निश्चित मिळेल असे टीमवर्क प्रशांत पाटील गडाख यांनी तयार करुन ठेवलेले आहे.

उदयन गडाख व नेहल गडाख
शंकरराव गडाख म्हणाले, पारनेरकरांनी मंत्री पदाची संधी हुकवली...

उदयन गडाख राजकीय घराण्यातील असले तरी गाव व परीसरात आल्यानंतर राजकारण बाजूला ठेवत गावातील समस्या व प्रश्नाला अग्रक्रम देतात.मुलभुत प्रश्न हक्काने सांगा अशी त्यांची भुमिका सर्वानाच भावणारी आहे.

- संतोष तांबे, ग्रामस्थ देडगाव

जेष्ठ नेते यशवंतराव गडाख व प्रशांत गडाख यांच्या प्रयत्नातून गावातच उच्च शिक्षणाची सुविधा झाल्याने दर्जेदार शिक्षण घेता आले. शिक्षणाला सामाजिक उपक्रमाची जोड असल्याचा खूप उपयोग होत आहे. उदयन व नेहलची निवड सार्थ आहे.

- मोनिका बाबासाहेब ओहळ, विद्यार्थिनी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com