जी ताकद हनुमान चालिसामध्ये ती ताकद नमाजमध्ये

अभिनेता सोनू सूद यांनी देशात हनुमान चालिसावरून सुरू असलेल्या राजकारणावर आपले मत व्यक्त केले.
Sonu Sood
Sonu SoodSarkarnama

अहमदनगर - शिर्डी येथे आज अभिनेते सोनू सूद आले होते. अभिनेता सोनू सूद यांनी कोपरगाव येथे आशासेविकांना सायकलचे वाटप केले. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी देशात हनुमान चालिसावरून सुरू असलेल्या राजकारणावर आपले मत व्यक्त केले. ( The strength that is in Hanuman Chalisa is the same strength in Namaz )

सोनू सुद दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून देशात प्रसिद्ध आहे. कोरोना काळातही त्यांनी केलेल्या मदतीने लोकांनी त्यांना "जरुरतमंदो का मसिहा गरिबो का मासिहा अश्या विविध उपाध्या दिल्या आहे. आज कोपरगाव नगरपरिषदेच्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील 26 आशा सेविकांना अभिनेता सोनू सूद यांनी सायकलिंचे वाटप केले.

Sonu Sood
मुख्यमंत्र्यांची घोषणा ; सोनू सूद महत्वाकांक्षी योजनेचा ब्रँड अम्बेसिडर

दरम्यान सोनू सूद यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सोनू सूद आल्याचे समजल्यानंतर महाविद्यालयीन तरूण तरुणींनी सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

सोनू सूद म्हणाले, धर्म आणि जातीतून बाहेर पडले तरच देशाची प्रगती होऊ शकते जी ताकद हनुमान चालिसामध्ये आहे ती ताकद नमाजमध्ये आहे. धर्मामध्ये अडकून पडला तर लोकांचे प्रश्न कधी सुटणार नाही, असा टोलाही त्यांनी धर्मावरून राजकारण करणाऱ्यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com