कोरोना मृतांच्या वारसांना राज्याने प्रत्येकी एक लाख रुपये द्यावेत : थोरतांची ठाकरेंकडे मागणी

महाराष्ट्रातील ( Maharashtra ) कोरोना ( Corona ) मृतांच्या वारसांना राज्य सरकारने प्रत्येकी एक लाख रुपये द्यावेत अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्याकडे केली आहे.
कोरोना मृतांच्या वारसांना राज्याने प्रत्येकी एक लाख रुपये द्यावेत : थोरतांची ठाकरेंकडे मागणी
Revenue Minister Balasaheb Thorat Sarkarnama

अहमदनगर : देशात मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने हाहाकार मजविला आहे. महाराष्ट्रातील कोरोना मृतांच्या वारसांना राज्य सरकारने प्रत्येकी एक लाख रुपये द्यावेत अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. The state should pay Rs 1 lakh each to the heirs of the deceased Corona: Thorat's demand to Thackeray

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोविडला राष्ट्रीय आपत्ती घोषित करत देश लॉकडाऊन केला होता. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आपत्तीतील मृतांना 4 लाख रुपये मदत देण्याची तरतूद आहे. ही बाब एककाळ वकील असलेल्या राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चफखलपणे हेरली आहे. कोविड मृतांना हा आपत्ती निधी मिळविण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन महत्त्वपूर्ण बाबी सांगितल्या आहेत.

Revenue Minister Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, शेतकऱ्यांसमोर अहंकारी केंद्र सरकार झुकले...

बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, राज्यघटनेने आपल्या नागरिकांना शिक्षण, आरोग्य आणि इतर आवश्यक सेवांचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. यासोबतच आपली राज्यघटना प्रत्येक नागरिकाला राज्याकडून त्यांचे घटनात्मक अधिकार प्राप्त करून घेण्याचाही अधिकार देते.

कोविड-19 महामारीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान राज्य सरकारच्या राज्य आपत्ति मदत निधी मधून दिले जावे असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने 11 सप्टेंबर 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयात दिले होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) अंतर्गत ही रक्कम केंद्र व राज्य सरकार 75 टक्के व 25 टक्के अशी दिली जाते.

Revenue Minister Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, ते खोल नैराश्यात गेले आहेत...

कोविड-19 महामारीची लागण देशभरात मोठ्या प्रमाणात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचे आर्थिक गणित पूर्ण बिघडले. अनेकांची आयुष्यभराची कमाई या महामारीने संपुवून टाकली व असंख्य कुटुंब कर्जबाजारी झाली आहेत. अशा परिस्थितीत केवळ 50 हजार रुपयांची आर्थिक मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत करणे सरकारला शक्य नाही असे केंद्र सरकार म्हणते. पण केंद्र सरकार पेट्रोलियम पदार्थांवरील करातून लाखो करोडो रुपयांची कमाई करते आणि बड्या उद्योगपतींना कार्पोरेट टॅक्समध्ये भरघोस सवलत देते, कोविड पीडितांना मदत द्यायची म्हटले की निधीची अडचण पुढे करते, हे पटत नाही.

केंद्र सरकारने कोविड-19 ला एनडीएमए अंतर्गत आपत्ती जाहीर करुन कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊनसह अनेक कडक निर्बंध लादले. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून भरभक्कम दंड वसूल करण्यात आले. परंतु एनडीएमए अंतर्गत सहाय्य निकषामध्ये 4 लाख रुपये मदतीचे प्रावधान असताना त्याची पूर्तता मात्र केली जात नाही.

Revenue Minister Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेसला पुन्हा सोनियाचे दिवस येतील 

एक कल्याणकारी राज्य म्हणून गरजेच्या वेळी आपल्या नागरिकांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 14 मार्च 2020च्या अधिसूचित केलेल्या पूर्वीच्या आदेशानुसार कोविड-19 मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याच्या केंद्र सरकारच्या वचनाची पूर्तता करावी ही आमची मागणी आहे .

एसडीआरएफ निकषांनुसार 4 लाखांपैकी 75 टक्के म्हणजे 3 लाख केंद्र सरकारने भरावे आणि उर्वरित 25 टक्के म्हणजे 1 लाख, राज्य सरकारचा हिस्सा आहे. आपण राज्य सरकारांच्या 1 लाख सानुग्रह रकमेचा हिस्सा अदा करण्याची हमी द्यावी म्हणजे केंद्र सरकारवर दबाव येऊन ते बाधित नागरिकांबद्दलची त्यांची वचनबद्धता पूर्ण करण्यास प्रवृत्त होईल. याद्वारे आपण आपल्या नागरिकांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा त्यांचा हक्क देण्यात यशस्वी होऊ, असे थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे.

देशात आत्तापर्यंत चार लाख 67 हजार जणांचा तर महाराष्ट्रात 1 लाख 41 हजार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यानुसार मृतांच्या नातेवाईकांना 1 हजार 410 कोटी रुपये राज्य सरकारला द्यावे लागतील.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in