नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानावर राज्यातील मंत्री बोलत नाहीत

आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी राज्यातील जनतेची महाविकास आघाडी सरकारने जनतेची कशी फसवणूक केल्याचे सांगितले.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानावर राज्यातील मंत्री बोलत नाहीत
Radhakrishna Vikhe patilSarkarnama

अहमदनगर - राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथे सुमारे 2 कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचा प्रारंभ आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात आमदार विखे पाटील यांनी राज्यातील जनतेची महाविकास आघाडी सरकारने जनतेची कशी फसवणूक केल्याचे सांगितले. ( The state ministers are not talking about the subsidy of farmers who are repaying their loans regularly )

या कार्यक्रमाला गोदावरी दूध संघाचे संचालक उत्‍तमराव डांगे, पंचायत समिती सदस्‍य दत्‍तात्रय डांगे, सरपंच शांताराम मुर्तडक, गणेश कारखान्‍याचे संचालक बाळासाहेब दाभाडे, उपसरपंच ज्ञानेश्‍वर डांगे, सोसायटीचे चेअरमन विलासा चौधरी, मारुती भांबारे, गणेश भांबारे, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे, उपभियंता देविदास धापटकर, शाखा अभियंता संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, तात्कालिक बदलांमध्ये जिल्हा बँक पुढेही शेतकऱ्यांचीच रहावी

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आघाडी सरकार फक्त घोषणा करते, अंमलबजावणी नाही. या सरकारच्या काळात सर्व कृषी योजना अनुदाना अभावी बंद पडल्या आहेत. योजनांना अनुदान नाही मात्र विदेशी दारुवरील कर मात्र सरकार माफ करते. ही शोकांतिका आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या अनुदानावर आघाडी सरकारमधील एकही मंत्री बोलायला तयार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, आज जगातील इतर देशांची परिस्थिती पाहिली तर जिथून कोविडचा उगम झाला. त्या चीन आणि शांघायमध्ये पुन्हा टाळेबंदी करावी लागली. आर्थिकदृष्ट्या हे देश सावरले नाहीत. मात्र भारताने या संकटावर मात करून पुन्हा नव्या उमदीने देश वाटचाल सुरू केली. याचे सर्व श्रेय केंद्र सरकारचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस उत्पादन करण्यापासून ते 180 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी टाकलेली पाऊलच देशाला सुरक्षित ठेवू शकली, असे स्पष्ट करून देशातील 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य देवून देशातील होणारी उपासमारी थांबविण्याचे मोठे काम पंतप्रधानांनी केले, असे आमदार विखे यांनी सांगितले.

Radhakrishna Vikhe patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, निळवंडेच्या गप्पा मारणारे 30 वर्षांपूर्वी कुठे होते...

राज्यातील आघाडी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले असून, सरकारच्या केवळ घोषणा सुरू आहेत. कोव्हीड संकटात कोणतीही मदत सरकारकडून मिळाली नाही, सरकार लस सुध्दा खरेदी करू शकले नाही. सर्वच बाबतीत केंद्रावर विसंबून राहिले. आज राज्यातील शेतकरी कुठल्याही योजनेचा लाभ मिळवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आपण कृषिमंत्री असताना सुरू केलेल्या योजना बंद पडल्या आहेत. कृषी विस्ताराचा सर्व कार्यक्रम ठप्प झाला असल्याचे सांगून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने दमडीचीही मदत केली नाही. हे सरकार फक्त शेतकऱ्यांकडून वसुली करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या म्हणून केंद्राच्या नावाने ओरडणारे महाविकास आघाडीचे नेते राज्यात पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी का करीत नाही. इतर राज्य याबाबतचा निर्णय करतात पण महाविकास आघाडी सरकारमध्ये दानत नाही. विदेशी वाईन वरील कर कमी करण्याचा तसेच मॉलमध्ये वाइन विक्रीचा निर्णय तातडीने होतो. मात्र नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याच्या केवळ आत्तापर्यंत घोषणा झाल्या. यावर आघाडी सरकारमधील एकही मंत्री यावर बोलायला तयार नाही, अशा शब्दात त्यांनी आघाडी सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.