भविष्यात शिक्षण व नोकरीमधील आरक्षणही राज्य सरकार घालवेल

भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीवर टीका केली.
Yogesh Tilekar
Yogesh TilekarSarkarnama

अहमदनगर – अहमदनगर शहरात भाजप ओबीसी मोर्चातर्फे ओबीसी समाजाच्या जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीवर टीका केली. ( The state government will also use reservation in education and jobs in future )

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. सुजय विखे पाटील होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, मेळाव्याचे संयोजक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, महामंत्री शंकर वाघ, शहर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष रायकर, संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग, विवेक नाईक, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते. नगरमध्ये किशोर डागवाले यांनी राज्यातील एका चांगल्या मोठ्या मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल टिळेकर यांनी त्यांचे आभार मानेल.

Yogesh Tilekar
सुजय विखे म्हणाले आम्ही शिवसेनेसोबतच...पण...

योगेश टिळेकर म्हणाले, राज्यातील आघाडी सरकार विश्वासघातकी आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा व ओबीसी समाजांचे हक्काचे आरक्षण गेले आहे. आज जर ओबीसी समाज जागृत होवून पेटून उठला नाहीतर भविष्यात शिक्षण व नोकरीमधील आरक्षणही हे विश्वासघातकी राज्य सरकार घालवेल. सत्ताधारी अनेक ओबीसी मात्री तोंड व हात बांधून आहेत. मात्र भाजप शांत बसलेला नाहीये. ओबीसी समाज भाजपाचा आत्मा आहे म्हणून आम्ही आक्रमक भुमिका घेत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, आडनावावर ओबीसी ठरवणे अशक्य आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला आपले हक्काचे आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी येणाऱ्या काळात भाजप अधिक आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरणार आहे. या शहराचा पुढील आमदार व महापौर भारतीय जनता पक्षाचा होण्यासाठी माझा ओबीसी समाज पूर्ण ताकदीने काम करेल, असे त्यांनी सांगितले.

Yogesh Tilekar
2024मध्ये सुजय विखे विरुद्ध नीलेश लंके अशी लढत होणार का?

सुजय विखे पाटील म्हणाले, राज्यातील आघाडी सरकारला ओबीसी समाजाबद्दल काहीही देणे घेणे नाही. जर मध्यप्रदेशमध्ये ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळू शकते तर राज्यात का नाही. त्यामुळे आता शांत बसू नका. या सरकार विरोधात आपण रान पेटवू, असे त्यांनी सांगितले.

प्रा. भानुदास बेरड म्हणाले, योगेश टिळेकर युवा मोर्चे प्रदेश अध्यक्ष असतांना मोठे काम राज्यात उभे केले होते. त्याच कामाची पावती ओबीसी मोर्च्याचे अध्यक्ष पदाने त्याना मिळाले आहे. कुटुंब प्रमुख जर सक्षम नसेल तर संपूर्ण कुटुंबाची वाताहात होते, हेच राज्यात घडत आहे.

यावेळी महेंद्र गंधे, किशोर डागवाले, संतोष रायकर यांचीही भाषणे झाली. शहर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी आभार मानले. उद्धव कलापहाड यांनी सूत्रसंचालन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com