
अहमदनगर - राज्याच्या विधानपरिषदेतील उपसभापती नीलम गोऱ्हे ( Nilam Gorhe ) या एका कार्यक्रमा निमित्त संगमनेरमध्ये आल्या होत्या. या प्रसंगी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना भाजप नेते आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ( The situation of BJP is like a man who throws cloth in a train and takes the place of another )
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, राजकारणात अस्थिरता खूप झाली आहे. पुढील 10 ते 15 वर्षांत बाबत विचाराल तर प्रत्येक वेळी नवीन आव्हानासाठी तयार रहावे लागेल. 2010 पर्यंत पाच-दहा वर्षांचा विचार केला जायचा. मात्र 2014ला आमची युती झाली आणि युतीचा पोपट मेला हे जाहीर करण्याचे काम एकनाथ खडसे यांनी केले. पुन्हा लोकसभेच्या वेळी आमची युती झाली आणि आमच्या लक्षात आले की आमचा विश्वासघात केला जात आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना याबाबतची भूमिका सुरू झाली.
त्या पुढे म्हणाल्या की, मी आज आशिष शेलार यांचे वक्तव्य वाचले की, 2017मध्येच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप एकत्र यायचे ठरलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेने बरोबर जाण्याची तयारी दाखविली नाही. म्हणून ते झाले नाही. आम्हाला उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र गेले तर ते त्यांना चालत नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले तर चालते. मग विरोधाला काय अर्थ राहिले. चिमुरची जागा भाजपने काढून घेतली. पुण्यातील खडकवासला निवडणुकीत एकत्रित उमेदवार निवडून आला. तीही जागा घेतली. ट्रेनमध्ये कापड टाकून दुसऱ्याची जागा घेणाऱ्या माणसासारखी भाजपची परिस्थिती असते. त्यांनी आमच्यासाठी कोणत्या जागा सोडल्या याचे उदाहरण द्यावे. मग उद्धव ठाकरें विषयी कुचके बोलण्याचा कावा करतात. आमची रोखठोक भूमिका आहे.
जनतेचा बुद्धिअंक काहीच नाही असे भाजपच्या नेत्यांना वाटते. त्यांच्या गर्वाचे हरण उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीने केले आहे. मागील वेळी सर्वांना एकत्रित घेऊन भाषिक विद्वेष पसरविण्याचे काम त्यांच्याकडून झाले. तोच प्रकार आताही सुरू आहे. किमान कोल्हापूरचा धडा त्यांनी लक्षात घेतला तर ते म्हणतात तीन पक्ष एकत्र आहेत. त्यांची सर्व प्रकारची गणिते चुकीत असे जनतेने ठरविले आहे. द्वेषाचे राजकारण करण्याचे काम भाजपने केले आहे. तेच केंद्रात व राज्यात आहेत. झुंडबळी, समाजात नावे बदलण्याचा विषय हैद्राबादचे भाग्यनगर एका रात्रीत करतात मात्र औरंगाबादचे संभाजीनगर करण्यासाठी त्यांना अॅलर्जी निर्माण होते. हा दुजाभाव चालू आहे. शिवसेनेचे नेते मीडियात येऊन भूमिका मांडतात म्हणून मीडियाची स्पेस अडविण्यासाठी राणा दाम्पत्यासारखे लोक आंदोलने करतात. असे प्रकार करून लोकांचा बुद्धिभेद केला जात असल्याची टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.