Shivsena Vs BJP : शिवसेनेच्या आमदारानं भर विधानसभेत भाजपच्या शेलारांना खाली बसवलं

राज्याच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता.
Shivsena, BJP
Shivsena, BJPsarkarnama

Shivsena Vs BJP : राज्याच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. भाजपचे आमदार आशिष शेलार ( Ashish Shelar ) एका विषयावर बोलत होते. त्यांना शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी खाली बसवलं. या घटनेची चर्चा आता सुरू झाली आहे.

Shivsena, BJP
नबाम रेबिया, आशिष शेलार प्रकरणाचा शिंदेंकडून दाखला; सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद

अधिवेशनात आज आशिष शेलार व अजय चौधरी यांची खडाजंगी झाली. आशिष शेलार एका मुद्द्यावर बोलत होते. त्याच वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेथे आले. त्यावेळी अजय चौधरी यांनी शेलारांना खाली बसायला सांगितले. यावर शेलारांनी 'होय मी पाहतो आहे. मला तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही.' असे खोचकपणे सांगितले.

Shivsena, BJP
परभणी जिल्हा परिषद अध्यक्षपदी निर्मला विटेकर; उपाध्यक्ष पदी अजय चौधरी बिनविरोध

शिवसेनेच्या एका आमदाराने सत्ताधारी भाजपच्या नेते आशिष शेलार यांना खाली बसविल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. शिवसेनेतील बंडापासून भाजप व शिवसेना यांच्यातील वैर वाढत आहे. यातच मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपमधील विरोधाची धार अधिक तीव्र होत चालली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com