मोठी बातमी : पंढरपुरातील सात मजली दर्शन मंडप पाडणार; बालाजीच्या धर्तीवर दर्शनाची सोय होणार

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
Pandharpur's Darshan Mandap
Pandharpur's Darshan MandapSarkarnama

पंढरपूर : पंढरपूर (Pandharpur) येथील विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal Mandir) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या सात मजली दर्शन मंडप लवकरच पाडण्यात येणार आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात तशी शिफारस करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या दर्शनासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर दर्शन रांग उभारण्याबाबत चाचपणी करण्यात येत आहे. (The seven-story Darshan Mandap in Pandharpur will be demolished)

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर समितीचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रभाकर देशमुख यांनी १९८७ मध्ये सात मजली दर्शन मंडप बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. ऊन पावसापासून वारकऱ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी हा दर्शन मंडप उभारण्यात आलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दर्शन रांगेसाठी याच दर्शन मंडपाचा वापर सुरू होता.

Pandharpur's Darshan Mandap
शिवसेना नेत्याने घेतली एकनाथ शिंदेंची भेट अन्‌ कामाचे केले कौतुक!

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरालगत असलेल्या दर्शन मंडपातील अपुऱ्या सोयींमुळे हा दर्शन मंडप मागील अनेक दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेला आहे. या मंडपातील काही ठराविक भागाचा दर्शन रांगेसाठी वापर केला जात आहे. दरम्यान, आता नव्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात विठ्ठल मंदिराशेजारी असलेला दर्शन मंडप पाडून त्या ठिकाणी वाहनतळ आणि मंदिर समितीचे कार्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या दर्शन रांगेसाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर काही योजना राबवता येतील का, याची पाहणी करण्यासाठी एक शिष्टमंडळ सध्या बालाजी देवस्थानमध्ये गेले आहे.

Pandharpur's Darshan Mandap
ना मोबाईल, ना पुरावा; सरपंच भाभींचा लागेना ठिकाणा; पोलिसही चक्रावले

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीमध्ये मंदिर समितीचे अध्यक्ष, वारकरी प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये दर्शन मंडपासह मंदिर परिसरातील इतर कामांबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी हा दर्शन मंडप पाडून त्या ठिकाणी वाहनतळ आणि मंदिर समितीचे कार्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांसदर्भात लवकरच एक बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये दर्शन मंडप पाडण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in