राणा दांपत्याने जे काय करायचे ते घरातच करावे; कायद हातात घेऊ नये...

मंत्री देसाई Shambhuraj Desai म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या Priminister Narendra Modi सुरक्षिततेच्या उपाय योजना आमचा गृहविभाग Home Department करतच आलेला आहे. मुंबईत Mumbai वेगळी परिस्थिती नाही.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaisarkarnama

सातारा ः कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा कुटुंबाने कायदा हातात घेऊ नये. त्यांना जे काय करायचे आहे ते त्यांनी त्यांच्या घरात करावे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न त्यांनी केल्यास ते मुंबई पोलिस सहन करणार नाहीत, असा सूचक इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

मातोश्रीपुढे हनुमान चालिसाचे पठण करण्याची भूमिका खासदार नवनीत राणा व रवी राणा यांनी घेतली आहे. यातून शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी राणा यांच्या निवासस्थानाबाहेर ठाण मांडून त्यांना प्रसाद देण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राणा यांच्या घराला पोलिस संरक्षण दिले आहे. एकुणच राणा दांपत्याच्या भूमिकेमुळे शिवसेनाही आक्रमक झालेली आहे.

Shambhuraj Desai
राणा दाम्पत्याचे घरात हनुमान चालिसा पठण: पण मातोश्रीवर जाण्याचा निर्धार कायम

याबाबत शिवसेनेचे नेते व राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत मुंबई पोलिसांची भूमिका मांडतानाच राणा कुटुंबियांना कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, मुंबई पोलिस ते सहन करणार नाहीत, असा इशारा दिला आहे. शंभूराज देसाई म्हणाले, धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मी गावाकडे आहे. आमच्या गृहविभागाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम सुरू आहे.

Shambhuraj Desai
Video: ...तर शिवसैनिक शांत बसणार नाही !; संजय राऊत

मुंबईत काही मंडळी जाणीवपूर्वक असंतोष व अशांतता कशी माजेल, याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी काही अज्ञात शक्ती त्यांना पाठीशी घालत आहेत. राज्यातील व मुंबईतील जनतेचे रक्षण करणे याला प्राधान्य देत आमचा गृहविभाग काम करत आहे. राणा कुटुंबियांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा निर्णय घेतला आहे. याविषयी विचारले असता ते म्हणाले, कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही.

Shambhuraj Desai
Video: यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजघाटावर महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

राणा दांपत्यांना पोलिसांनी कालच प्रतिबंधात्मक नोटीस बाजावली आहे. त्यामुळे त्यांनी कायदा हातात घेऊ नये. त्यांना जे काय करायचे आहे ते त्यांनी घरात करावे. त्यांनी कायदा हातात घेतल्यास मुंबई पोलिस ते सहन करणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेच्या काय उपाय योजना केल्या आहेत, या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या सुरक्षिततेच्या उपाय योजना आमचा गृहविभाग करतच आलेला आहे. मुंबईत वेगळी परिस्थिती नाही. पंतप्रधानाच्या सुरक्षिततेसाठी सर्व काही उपाय योजना करून खबरदारी घेत आहोत, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in