Congress : काँग्रेसच्या 'त्या' २३ नेत्यांचा उद्देश सफल... लोकशाही पद्धतीनेच अध्यक्षांची निवड...

सोनिया गांधी Soniya Gandhi यांच्यानंतर राहूल गांधी Rahul Ghandhi यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास नकार दिल्याने आम्ही निवडणुकांचा आग्रह धरला.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavansarkarnama

कऱ्हाड : काँग्रेसच्या ज्या २३ नेत्यांनी मागणी केली होती. त्याप्रमाणे पक्षाचा अध्यक्ष निवडला गेला आहे. त्यामुळे त्या २३ नेत्यांचा उद्देश सफल झाला आहे. पक्ष पुन्हा एकदा ताकतीने काम करेल. नुतन अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे चांगले संघटक आहेत. त्याचा निश्चित फायदा होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

दिवाळीनिमित्त श्री. चव्हाण यांनी आज कराडात पत्रकारांशी संवाद साधला. सोनिया गांधी यांना पत्र लिहले होते. ते पत्र गोपनीय होते. ते फुटल्याने आम्हाला बंडखोरीचे नाव देण्यात आले. सोनिया गांधी यांची भेट होऊ शकत नसल्याने पत्र लिहिले होते. त्या पत्रातील अपेक्षेप्रमाणे लोकशाही पद्धतीने पक्ष अध्यक्षांची निवड झाली आहे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

राज्य सरकारवर टीका करताना श्री. चव्हाण म्हणाले, राज्यातील सरकार अत्यंत अस्थिर आहे. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. भाजपने मुंबई महापालिका व राज्यातील जिल्हा परिषेदमुळे शिंदे गटाला जवळ केले आहे. भाजप शिंदे गटाच्या मदतीने मुंबई महापालिका लढवू इच्छीते. त्या निवडणुकीनंतर काय होईल, हे सांगता येणार नाही.

Prithviraj Chavan
Congress : काँग्रेसमध्ये नाराज आहात का? पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितले

भाजपच्या विरोधात काँग्रेसने संघटन बांधणी सुरू केली आहे. ती बांधणीही आम्ही सुचवलेल्या पर्यायांचा एक भाग आहे. पक्षाच्या निवडणूका लोकशाही पध्दतीने झाल्या पाहिजेत, अशी आमची मागणी सोनिया गांधी यांनी मान्य केल्याने लोकशाही पद्धतीने पक्षाचा अध्यक्ष निवडला गेला आहे. त्यामुळे आमचा हेतू साध्य झाला आहे.

Prithviraj Chavan
Patan : नुकसानीच्या पहाणीसाठी शंभूराज देसाई पोहोचले बांधावर; पंचनामे करण्याचे आदेश

सोनिया गांधी यांच्यानंतर राहूल गांधी यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास नकार दिल्याने आम्ही निवडणुकांचा आग्रह धरला. त्यानंतर पक्षाने पहिला मेळावा उदयपूर येथे घेवून संघटन बांधणीवर लक्ष दिले आहे. त्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार 'भारत जोडो' यात्रेचा निर्णय झाला. त्यात राहूल गांधी यांनी पुढाकार घेवून ती यात्रा सुरू केली आहे.

Prithviraj Chavan
जब तक देश मे है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की ऑंधी,  तब तक कैसे बनेंगे प्रधानमंत्री राहूल गांधी 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com