सर्वसामान्यांचे हाल करणे हाच राज्य व केंद्र सरकारचा हेतू

बुलडाणा येथून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetti ) आज शेगाव येथे आले होते.
Raju Shetty
Raju Shettysarkarnama

शेगाव - बुलडाणा येथून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetty ) आज शेगाव येथे आले होते. त्यांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले. त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी बोलताना त्यांनी राज्यातील भोंगे, हिजाब, हनुमान चालिसा यावरून सुरू असलेल्या राजकारणावर टीका केली. ( The purpose of the state and central government is to make the common man suffer )

राजू शेट्टी यांनी आदिवासी भागातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे जाहीर सभा आयोजित केली आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.

Raju Shetty
राजू शेट्टींनी सांगितले भोंगे वाजण्यामागचे कारण...

राजू शेट्टी म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. देशात महागाईने कळस गाठला आहे. वीज कपात, इंधन दरवाढ, घरगुती गॅस दरवाढ, प्रचंड बेरोजगारी, या महत्वपूर्ण प्रश्नाकडील लक्ष विचलित करून भोंगे, हिजाब व चालिसा या प्रश्नांवर चर्चा करून इतरांची करमणूक करणे व सामान्य जनतेचे हाल केले जात आहेत. हे सर्व प्रश्न सोडविण्यास राज्य व केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. सर्व सामान्यांचे हाल कसे होतील हाच हेतू राज्य व केंद्र सरकारचा असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in