माजी सहकारमंत्री देशमुखांच्या कारखान्यातूनच होतयं प्रदूषण; ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन

Subhash Deshmukh : प्रदूषण नियंत्रक मंडळही दखल घेत नाही.
ex minister subhash deshmukh
ex minister subhash deshmukh Sarkarnama

सोलापूर : भाजप (BJP) नेते आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्या लोकमंगल कारखान्याविरोधात लांबोटी गावच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन पुकारलं आहे.

मोहोळ तालुक्यात असणाऱ्या लोकमंगल डिस्टलरी प्लांटच्या कारखान्याचे केमिकल मिश्रित पाण्याची योग्य विल्हेवाट लावली नसल्याने या कारखान्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या लांबोटी गावाला या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्याचा फटका बसत आहे. त्यामुळे गेल्या एका महिन्यापासून गावच्या पिण्याचा पाणी पुरवठा बंद असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. यामुळेच ग्रामस्थांनी त्याविरोधात चक्क जलसमाधी आंदोलन पुकारलं आहे. (ex minister subhash deshmukh Latest News)

ex minister subhash deshmukh
शिवसेनेला रोज संजय राऊत यांची आठवण... तोडीस तोड उत्तर देणाऱ्या नेत्याची वाणवा

ग्रामस्थांच्या मते, लोकमंगल कारखान्याला वारंवार निवेदन देवूनही त्याची दखल घेतली जात नाही. प्रदूषण नियंत्रक मंडळही दखल घेत नाही. या कारखान्यातून बाहेर पडणारे पाणी थेट लांबोटी गावच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याला येते. या ओढ्याच्या कडेच्या गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर असून या विहिरीचे पाणी देखील दूषित झाले असल्याचे लांबोटी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य दखल घेऊन गावाला न्याय द्यावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ex minister subhash deshmukh
राणेंना हायकोर्टाचा दणका; 'अधीश' बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे दिले आदेश...

दरम्यान, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्याविरोधात लांबोटी ग्रामस्थांनी थेट जलसमाधी आंदोलन पुकारल्याने आता याप्रकरणी काय तोडगा निघतो. हे पाहण महत्वाच ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in