अगवणेंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सभापतींचे राजकारण...अनुप शहा

मालोजीराजेंच्या फलटणमध्ये Phaltan विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांनी गलिच्छ राजकारण Bad Politics करणे योग्य नाही...
Anup Shah, Ramraje Naik Nimbalkar
Anup Shah, Ramraje Naik Nimbalkarsarkarnama

सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे स्वतः दिगंबर अगवणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून गलिच्छ राजकारण करत आहेत. तसेच त्यांच्याकडून खासदारांना बदनाम करण्यासाठी शिखंडीचे युद्ध सुरू असल्याची टीका भाजपचे अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप शहा यांनी केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून फलटणमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि दिगंबर आगवणे यांच्यात संघर्ष सुरू आहे. यामध्ये दिगंबर आगवणे यांनी खासदारांवर दाखल केलेल्या तक्रारी खोट्या असल्याचे समोर आले आहे. ज्या तक्रारदाराने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर तक्रार दाखल केली त्यांनी स्वतःच पत्रकारांसमोर येत ही तक्रार दिगंबर आगवणे यांनी करण्यास भाग पडल्याचे कबूल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Anup Shah, Ramraje Naik Nimbalkar
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची घाई : रामराजे

याबाबत बोलताना भाजपचे अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप शहा यांनी या सगळ्या गोष्टींच्या मागे विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर असल्याचे खळबळजनक आरोप केला आहे. मालोजी राजेंच्या फलटणमध्ये सभापती स्वतः दिगंबर अगवणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून असेल गलिच्छ राजकारण करत आहेत. तसेच त्यांच्याकडून खासदारांना बदनाम करण्यासाठी शिखंडीचे युद्ध सुरू असल्याचे अनुप शहा यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com