तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांशी वाद; स्वागताचे बॅनर हटवले

Tanaji Sawant : सोलापुरात तानाजी सावंत यांच्या स्वागातासाठी लावलेले बॅनर पोलिसांनी हटवले
Tanaji Sawant
Tanaji Sawantsarkarnama

सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या संदर्भातील वाद काही थांबत नाहीत. आता स्वागतासाठी उभारलेले बॅनर पोलिसांनी काढले आहेत. त्यामुळे सावंत यांच्या समर्थकांमध्ये आणि पोलिसांमध्ये चांगलाच वाद झाला.

Tanaji Sawant
मोठा गाजावाजा करूनही अवघे तीनच पदाधिकारी लागले सावंतांच्या गळाला!

तानाजी सावंत आज सोलापूरमध्ये (Solapur) येणार आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी विनापरवानगी स्वागताचे बॅनर लावल्याने जिल्हा प्रमुख मनीष काळजे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. सावंत यांच्या स्वागतासाठी मोठे बॅनर लावण्यात आले होते. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहच्या प्रवेशद्वारसमोरच कार्यकर्त्यांनी बॅनर लावले होते. त्यामुळे पोलिसांनी ते हटवले आहे.

बॅनर लावण्यासाठी परवानगी न घेतल्यामुळे पोलिसांनी बॅनर हटले. मात्र, बॅनरसाठी परवानगी मागितल्यानंतरही प्रशासनाने जाणीवपूर्वक परवानगी नाकारल्याचा आरोप एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांनी केला आहे.

Tanaji Sawant
सावंतांनी रूग्णालयाला भेट दिली अन् शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं

दरम्यान, माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे आज (ता. ५ सप्टेंबर) तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा दौरा होता. सावंत यांच्या दौऱ्यात अडथळा नको म्हणून येथील सर्व शिवसैनिकांना (shivsena) पोलिसांनी नोटीस बजावल्या होत्या. तसेच, अमोल उराडे व रुपेश लाळगे या दोन शिवसैनिकांना स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र, तानाजी सावंत यांच्यावर शिवसैनिकांमध्ये अजूनही रोष असल्याचे दिसून आले. कारण, तानाजी सावंत गेलेल्या मार्गाचे शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in