नागरदेवळेचे लोक म्हणाले, नगरपरिषद नको ग्रामपंचायतच पाहिजे

नागरदेवळेत नगरपरिषदेला मान्यता म्हणजे राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांना दिलेला मोठा धक्का समजला जातो.
Nagardewale
Nagardewale Datta Ingale

अहमदनगर - अहमदनगर कँन्टोन्मेंट हद्दीच्या लगत नागरदेवळे ( ता. नगर ) हे गाव आहे. या गावाला नगरपरिषद करण्याला राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली. ही मान्यता म्हणजे राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांना दिलेला मोठा धक्का समजला जातो. मंत्रीमंडळाच्या या निर्णया विरोधात कर्डिले समर्थक असलेले ग्रामपंचायतचे सदस्य न्यायालयातही गेलेले आहे. ( The people of Nagardevale said that they do not want a Municipal Council but a Gram Panchayat )

शहर व कँटोन्मेंटलगत असलेल्या नागरदेवळे ग्रामपंचायतीत आज (ता. 15) ग्रामसचिवालयासमोर, नगरपरिषद की ग्रामपंचायत, याबाबत विशेष ग्रामसभा घेण्यात आली. मतदान घेऊन लोकांचा कलही जाणून घेण्यात आला. या वेळी कॅम्प पोलिस ठाण्याच्या पोलिस बंदोबस्तात, नगर पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी संजय केदारे यांच्या उपस्थितीत ग्रामविकास अधिकारी रामभाऊ आबूज यांनी मतदान घेतले.

Nagardewale
प्राजक्त तनपुरे म्हणाले, भाजपला आंदोलनाचा अधिकार नाही...

यात ग्रामपंचायतीच्या बाजूने 578 ग्रामस्थांनी, तर नगरपरिषदेच्या बाजूने 484 ग्रामस्थांनी मतदान केले. एकंदरीत, नागरदेवळ्याच्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतच बरी वाटते आहे. नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच ग्रामसभेला मोठी गर्दी झाली होती.

नगर तालुक्यातील नागरदेवळ्यासह शेजारच्या वडारवाडी, शहापूर, केतकीसह नगरपरिषद करण्याचा प्रस्ताव मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज्य सरकारकडे पाठविला होता. यावरून शिवाजी कर्डिले व तनपुरे यांच्यात गेल्या चार महिन्यांपासून वाक्‌युद्ध सुरू आहे.

Nagardewale
अक्षय कर्डिलेंची मोठी घोषणा : राजकारणाचा नवा डाव ठरला

आज (मंगळवारी) नागरदेवळे ग्रामपंचायतीने सरपंच सविता पानमळकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलाविली होती. दोन तासांच्या चर्चेनंतर, नगरपरिषद व्हावी की ग्रामपंचायत, यासाठी मतदान घेतले गेले. यात 450 महिला व 612 पुरुषांनी अशा एकूण 1 हजार 62 ग्रामस्थांनी मतदान केले. नगरपरिषदेच्या बाजूने 484 तर ग्रामपंचायतीच्या बाजूने 578 जणांनी मतदान केले. याचा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे.

नागरदेवळेत नगरपरिषद झाल्यास तालुक्यातील मतदानाचा मोठा टक्का जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत मतदान करू शकणार नाही. नागरदेवळे हे शिवाजी कर्डिले यांच्या समर्थकांचे गाव समजले जाते.

Nagardewale
नगर तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करा - शिवाजी कर्डिले

ग्रामपंचायत की नगरपरिषद, याबाबत आज ग्रामसभेत मतदान झाले. ग्रामपंचायतीच्या बाजूने बहुमत झाले आहे. याचा ठराव लवकरच राज्य प्रशासनाला सादर करणार आहोत.

- सविता पानमळकर, सरपंच, नागरदेवळे ग्रामपंचायत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in