पक्ष ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नव्हे; सर्वांना सामावून घ्या...

बाळासाहेब पाटील Balasaheb Patil म्हणाले, सातारा Satara जिल्हा हा खासदार MP शरद पवार Sharad Pawar साहेबांच्या विचारांना मानणारा आहे. या जिल्ह्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचली पाहिजे.
Jayant Patil
Jayant Patilsarkarnama

सातारा : ''पक्ष ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. त्यामुळे सर्व स्तरातील लोकांना पक्षात समाविष्ट करून घ्यावे. महाराष्ट्रातील जनता हुशार असून कोणाला कुठे बसवायचे ते त्यांना माहिती आहे,'' असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील माण खटाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवकचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

Jayant Patil
२०२४ ला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा आहे; तयारीला लागा : जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले, ''सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पक्षाचे नेते यांच्यात जर चांगला संवाद असेल तर पक्षात चांगली परिस्थिती निर्माण होते. सत्ता येते किंवा जाते पण कार्यकर्ते व पक्ष यांचे नाते हे नेहमीच घट्ट असते. ते अधिकाधिक मजबूत होण्यासाठी मुक्तपणे संवाद आवश्यक आहे. पक्ष हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. त्यामुळे सर्वच स्तरातील लोकांना पक्षात समाविष्ट करून घ्या, असे सांगून ते म्हणाले, ''महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. त्यांना माहिती आहे की कोणाला कुठे बसवायचे,'' असे ही त्यांनी स्पष्ट केले.

Jayant Patil
उदयनराजे संतप्त : राज्यपालांनी ते वक्तव्य मागे घ्यावे

बाळासाहेब पाटील म्हणाले, ''सातारा जिल्हा हा खासदार शरद पवार साहेबांच्या विचारांना मानणारा आहे. या जिल्ह्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचली पाहिजे. आपण सर्वांनी त्यासाठी अधिकचा वेळ द्यायला हवा. तसेच तरुणांमध्ये नवीन ऊर्जा झपाट्याने निर्माण होते. त्यांना घडविण्यासाठी येणार्‍या काळात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यात येतील,'' असेही त्यांनी सांगितले.

Jayant Patil
Maratha Reservation :संभाजीराजे यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण

यावेळी सुभाष शिंदे, महिला निरीक्षक वैशाली दाभाडे, सेवादल सदस्य राजेंद्र लाबंधरे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष शफिक शेख, युवक अध्यक्ष तेजस शिंदे, युवती जिल्हाध्यक्ष पूजा काळे, युवती जिल्हा कार्याध्यक्ष सुजाता भोसले, सभापती निलिमा पोळ, माजी सभापती संदीप मांडवे, नगराध्यक्ष मनिषा काळे, उपनगराध्यक्ष मनोज जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुडगे, नंदू मोरे, माजी तालुकाध्यक्ष खटाव हिंदुराव गोडसे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील गोडसे, बंडा गोडसे, माजी नगराध्यक्ष युवराज सूर्यवंशी, कविता मेत्रे, सीमा जाधव, सुहास कदम आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com