राष्ट्रवादी हा भांडण लावणारा पक्ष; माणमध्ये फक्त जयकुमार गोरेंचेच सरकार...

आमदार गोरे MLA Gore म्हणाले, मी बोलत नाही, करून दाखवतो. माण Maan, खटावमधील Khatav पुढाऱ्यांची संख्या बरीच आहे. कोविडमध्ये Covid 19 मात्र, एकही नेता जनतेबरोबर दिसला नाही.
Jaykumar Gore, MLA Maan
Jaykumar Gore, MLA MaanDhanaji Kawade, shingnapur

शिखर शिंगणापूर (ता. माण) : महाराष्ट्रात कोणाचेही सरकार असू देत. माण तालुक्यात फक्त जयकुमार गोरेंचेच सरकार असल्यानेच एवढा भरीव निधी शिंगणापूरसाठी मंजूर केला. चांगला विकास करणारी माणसं निवडा, आम्ही विकासासाठी आहोत. 'राष्ट्रवादी' हा विकासाचा पक्ष नसून फक्त भांडण लावणारा पक्ष असल्याची टीका आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे.

शिंगणापूर येथे मंजूर केलेल्या एक कोटी ६० लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार गोरेंच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आमदार गोरे म्हणाले, ''मी बोलत नाही, करून दाखवतो. माण, खटावमधील पुढाऱ्यांची संख्या बरीच आहे. कोविडमध्ये मात्र, एकही नेता जनतेबरोबर दिसला नाही. मी मात्र, जिवाची पर्वा न करता कोविड सेंटर सक्षमपणे चालविले. पावणेचार हजार रुग्णांवर उपचार केले.

Jaykumar Gore, MLA Maan
राज्यमंत्री भरणेंची ऑफर आमदार जयकुमार गोरे स्वीकारणार का?

मात्र, त्याची अजिबातही जाहिरात केली नाही. राज्यात सत्ता असताना एक रुपयाही तालुक्यासाठी आणता आला नाही. निवडणुकीत सुमारे ८८ हजार मते घेतलेल्या जनतेला वाऱ्यावर सोडून हे नेते बनू पाहात आहेत.'' दुष्काळी तालुक्यातील पाणी, वाढती ऊस शेती, कारखाने हे माझे कर्तृत्व आहे. आता किरकसाल, शंभूखेडसारख्या दुर्गम भागात पाइपलाइनने पाणी पोचवणार आहे, असेही आमदार गोरेंनी स्पष्ट केले.

Jaykumar Gore, MLA Maan
भाजप आमदाराची स्टंटबाजी; राजीनामा लिहिला पण विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहचलाच नाही!

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, पंचायत समिती सदस्या रंजना जगदाळे, हरिभाऊ जगदाळे, राजवडीचे माजी सरपंच विठ्ठलराव भोसले, विलासराव देशमुख, सरपंच रेश्मा शिंगाडे, उपसरपंच शशिकांत भोसले, राजप्पा पोळ, काका शिंदे, माजी सभापती रमेश कदम, साहेबराव भगत, बाळासाहेब देवकर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com