कबड्डीपटू मुलीच्या हत्येची घटना माणुसकीला काळीमा फासणारी...

पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं, हे अतिशय निंदनीय असून आम्ही मुलीच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
कबड्डीपटू मुलीच्या हत्येची घटना माणुसकीला काळीमा फासणारी...
Udayanraje Bhosalefacebook

सातारा : पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात (Pune Bibwewadi Area) अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत (Kabaddi Player) असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन तिची हत्या झाल्याची घटना मन हेलावून टाकणारी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं, हे अतिशय निंदनीय व सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असल्याची भावना खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी फेसबुक अकौंटवरून व्यक्त केलीय.

या घटनेचा खासदार उदयनराजेंनी संताप व्यक्त करत निषेधही नोंदविलाय. त्यांनी म्हटले की, शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेलीय. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं, हे अतिशय निंदनीय असून आम्ही मुलीच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Udayanraje Bhosale
उदयनराजे म्हणतात, निवडणुकीवर खर्च करण्यापेक्षा बिनविरोध करा....

पुण्यातील 14 वर्षीय कबड्डीपटूच्या हत्या प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन मुलीची कोयत्याने हत्या करुन आरोपी लपून बसला होता. या हत्याकांडानं पुण्यातच नाही, तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनीही तात्काळ या प्रकरणाची दखल घेत आरोपीला शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. अखेर 12 तासांच्या आतच आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in