Udayanraje Bhosale : कै. गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने उदयनराजेंना अश्रू अनावर

खासदार उदयनराजेंनी Udayanraje Bhosale भेट म्हणून कै. गोपीनाथ मुंडे Gopinath Munde यांची प्रतिमा स्विकारली. यावेळी त्यांनी सदर प्रतिमेचे चुंबन घेतले
Udayanraje Bhosale, Late Gopinath Munde
Udayanraje Bhosale, Late Gopinath Mundesarkarnama

दहिवडी : आपल्या ह्रदयात मानाचे स्थान दिलेल्या कै. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेताना खासदार उदयनराजे भोसले भावनाविवश झाले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त उदयनराजे भोसले हे शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाच्या दर्शनाला आले होते. दर्शन व अभिषेक झाल्यानंतर परतीच्या प्रवासात त्यांनी दहिवडी येथील चैतन्य करिअर ॲकॅडमीला भेट दिली.

Udayanraje Bhosale, Late Gopinath Munde
Satara : डाॅल्बी वाजलीच पाहिजे... दोन तासांत काय आभाळ कोसळणार का... उदयनराजे भडकले

या भेटी दरम्यान त्यांनी कै. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यावेळी ते भावनाविवश झाले व त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांना भेट म्हणून त्यांची स्वतःची प्रतिमा देण्यात येणार होती. त्याऐवजी त्यांनी भेट म्हणून कै. गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा स्विकारली. यावेळी त्यांनी मुंडे यांच्या प्रतिमेचे चुंबनही घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com